फलटण प्रतिनिधी : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट जेजुरी च्या मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त पदी पोपटराव खोमणे यांची निवड झाल्याबद्दल राज्यातील विविध रामोशी समाज बांधवांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
अखिल भारतीय बेरड बेडर रामोशी समाज कृती समिती, एम. एम ग्रुप महाराष्ट्र राज्य, समाज परिवर्तन संघ, आद्य क्रांतिवीर राजीव उमाजी नाईक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र धर्म जागरण प्रसारक मंडळ आणि संघटनेच्या वतीने विश्वस्त पोपटराव खोमणे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय बेरड बेडर रामोशी समाज कृती समिती अध्यक्ष मा.श्री.मोहन नाना मदने तसेच आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.आप्पासाहेब चव्हाण व मा.श्री.पै. गुलाबराव भंडलकर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटना सातारा जिल्हा, मा.श्री.रवीकाका खोमणे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक युथ फाउंडेशन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ,मनोज आडके आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटना फलटण तालुका अध्यक्ष राजाभाऊ मदने निंभोरे, राजाभाऊ शिरतोडे,रामभाऊ मदने, बाळासाहेब चव्हाण, सोपान पाटील, मधुकर जाधव, डॉ.पी.वाय जाधव सह रामोशी समाज बांधवांनी अभिनंदन केले.