सातारा, दि. 30 :- राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲङ गौरी छाब्रिया यांनी महिला आयोगामार्फत चालविल्या जाणाऱ्या महिला समुपदेशन केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला.
ॲङ छाब्रिया यांनी दौऱ्या प्रसंगी महिला समुपदेशन केंद्र जिल्हा परिषद, सातारा व व सातारा तालुका पोलीस स्टेशन आवारातील महिला समुपदेशन केंद्रास भेटी दिली व कामकाजाचा आढावा घेवून वर्षभरात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी सातारा व कराड येथील निर्भया पथकास तसेच जिल्हा बार असोसिएशनच्या सदस्यांशीही संवाद साधला.



















