Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल?

काशीळच्या कोविड रुग्णालयामुळे रुग्णांना मिळणार चांगली आरोग्य सुविधा

ना. बाळासाहेब पाटील : काशीळ येथे कोविड रुग्णालयाचे उद्घाटन संपन्न
टीम : धैर्य टाईम्स
‘काशीळ येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालय कराड व सातारच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कराड व सातारा तसेच काशीळ परिसरातील नागरिकांना या रुग्णालयाचा लाभ होणार असून, या रुग्णालयामार्फत कोविड रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत,’ असा विश्‍वास पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

नागठाणे : देशासह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे बेड अपुरे पडत आहेत.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले असून येथे सुरू केलेल्या कोविड सेंटरमुळे ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी धावपळ थांबणार असून येथे रुग्णावर चांगले उपचार होणार आहेत.त्यामुळे हे कोविड सेंटर ग्रामीण भागासाठी वरदान ठरणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

काशीळ (ता. सातारा) येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीदार आशा होळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भरत माने, कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले की,  सातारा येथील जंबो कोविड सेंटरच्या माध्यमातूनच या सेंटरचे काम चालणार आहे. येथे एकूण 63 बेड्सची व्यवस्था असून सध्या तातडीने 31ऑक्सिजन बेड टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.32 व्हेंटिलेटर बेड्सही लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की सातारा-कराड महामार्गावरील हे सेंटर मध्यवर्ती असून परिसरातील सर्वांना हे उपयुक्त ठरणार आहे. निधी नसल्यामुळे व मागच्या सरकारच्या दुर्लक्षामुळे रुग्णालयाचे काम रखडले होते. आमचे सरकार आल्यावर या कामाला गती मिळाली. त्यामुळे येथे सध्या खाजगी संस्थेच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्यात येणार असून लवकरात लवकर  शासनाने येथे नियमित शासकीय वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक करावी. त्यामुळे कोविड नंतरही सर्वसामान्य रुग्णांना सेवा उपलब्ध होईल अशी मागणीहि यावेळी त्यांनी केली.

नागठाणे पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला यश
गतवर्षी कोरोनाकाळात मोठा गाजावाजा करून या ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मधल्या काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. फेब्रुवारीपासून पुन्हा पेशंट वाढू लागल्याने व बेड अपुरे पडू लागल्याने प्रशासनाची तारांबळ उडू लागली. मात्र, तरीही काशीळच्या कोविड सेंटरबाबत कोणत्याच हालचाली सुरू नव्हत्या. या घटनेची नागठाणे भाग पत्रकार संघाने गांभीर्याने दखल घेत येथील विविध दैनिकांच्या पत्रकारांनी आपापल्या दैनिकांमधून काशीळ येथे कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात बातम्याद्वारे आवाज उठवला होता. त्याचीच दखल घेत प्रशासनाने तातडीने येथे हे सेंटर सुरू केले. त्यामुळे नागठाणे विभागातील सर्व पत्रकारांचे परिसरातील ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER