सातारा : सातारा जिल्हा कृषी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सातारा जिल्हा बँकेचे प्रॉपर्टी विभागाचे अधीक्षक विश्वजित राजुरकर यांची निवड सर्वानुमते बिनविरोध झाली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा अध्यासी अधिकारी किरण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमित काळे, माजी चेअरमन उद्धव देशमुख, संजय मांढरे, यशवंत मेंगडे, विश्वास गायकवाड, अभिजित देशमुख, प्रसन्ना शेडगे, धनंजय हिरवे, निलेश गोडसे, सौ. वैशाली शिंदे आदींची उपस्थिती होती.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमित काळे, माजी चेअरमन उद्धव देशमुख, संजय मांढरे, यशवंत मेंगडे, विश्वास गायकवाड, अभिजित देशमुख, प्रसन्ना शेडगे, धनंजय हिरवे, निलेश गोडसे, सौ. वैशाली शिंदे आदींची उपस्थिती होती.
या निवडीबद्दल विश्वजित राजुरकर यांचे बँकेचे चेअरमन श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ संचालक व विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, संचालक आ. शशिकांत शिंदे, विक्रमसिंह पाटणकर (माजी मंत्री), दत्तात्रय ढमाळ, आ. मकरंद पाटील, नितीन पाटील, राजेंद्र राजपुरे, शिवरूपराजे खर्डेकर, राजेश पाटील( वाठारकर), अनिल देसाई, प्रकाश बडेकर, प्रदिप विधाते, वसंतराव मानकुमरे, संचालिका सौ. कांचन साळुंखे, तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे आणि सर्व कर्मचार्यारी वृंद यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेछ्या दिल्या.
विश्वजित राजुरकर म्हणाले, संस्थेचे कामकाज आदर्शवत असून या संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या आर्थिक गरजा वेळेत पूर्ण करण्याचे आणि सर्व संचालक मंडळाला बरोबर घेऊन काम करणार असलेचे त्यांनी नमूद केले.