फलटण प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धिमत्तेचा समृद्ध वारसा समाजाला दिला आहे. तोच वारसा पुढे चालवत गावोगावातील विद्यार्थी स्पर्धापरीक्षेतून अधिकारी घडवण्यासाठी अभ्यासिका निर्माण करण्याची काळाची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोरे यांनी केले, ते फलटण येथील नगरसेवक सनी अहिवळे मित्र मंडळ व सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विक्रीकर निरिक्षक (S.T.I.) परीक्षेत उज्वल यश प्राप्त केल्याबद्दल फलटण येथील अनिकेत दिपक काकडे यांचा सत्कार प्रसंगी बोलत होते.
यावेळी सेवानिवृत्त वॉरंट ऑफिसर जे. एस. काकडे, माजी नगरसेवक सनी अहिवळे, सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष सौ सुपर्णाताई अहिवळे, पत्रकार रोहित अहिवळे, शक्ती भोसले भाग्यवंत काकडे यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सचिन मोरे म्हणाले की, अनिकेत काकडे यांचा सत्कार हा त्यांनी केलेल्या मेहनतीला शाबासकीची पाठीवर थाप आहे तर इतरांसाठी प्रेरणा आहे. भविष्यातील तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे काम अशा सत्कारामधून होत असते.
अनिकेत काकडे यावेळी बोलताना म्हणाले की, विध्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवत सकारात्मक विचार ठेवल्यास यश निश्चित मिळते, त्यामुळे आपले ध्येय निश्चित करून मार्गदर्शन घेत यश निश्चित मिळते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विक्रीकर निरिक्षक (S.T.I.) परीक्षेत उज्वल यश प्राप्त केल्याबद्दल अनिकेत दिपक काकडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
यावेळी अनिकेत काकडे यांचे पालक दिपक काकडे, सौ. मालन काकडे यांच्या सह महादेव गायकवाड, मंगेश आवळे, लक्ष्मण काकडे, रवी गायकवाड, प्रवीण काकडे यांच्या सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी जे. एस. काकडे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार शक्ती भोसले यांनी मानले.