फलटण प्रतिनिधी : फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक सचिन अहिवळे मित्र परिवार यांच्या वतीने फलटण तालुक्यातील विविध क्षेत्रात स्पर्धा परीक्षातून उज्ज्वल यश संपादित केलेल्या मान्यवरांचा फलटण येथे शनिवारी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी धैर्य टाईम्सला दिली.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षामधून अधिकारी पदावर निवड झालेल्या व इतर यशवंताचा भव्य सत्कार सोहळा संपन्न होत आहे. यावेळी प्रसाद मधुकर काकडे (सहाय्यक सरकारी अभियोक्ता अधिकारी वर्ग १ ), शीतल किरण अहिवळे भोसले (सहाय्यक सरकारी अभियोक्ता अधिकारी वर्ग १), प्राचार्य डॉ. वर्धमान विनायक अहिवळे विधी Law (पीएचडी), मिलिंद दत्ता अहिवळे (दूतावास कार्यालय थायलंड), शंकेश्वर हणमंत अहिवळे (पोलीस उपनिरीक्षक), सुप्रिया महादेव आढाव (पोलीस उपनिरीक्षक), मोहिनी विजय जाधव (पोलीस उपनिरीक्षक), अजय सुनील मिसाळ (पोलीस उपनिरीक्षक), सनी विनायक बनसोडे (उद्योग निरीक्षक) सिग्नल, कुमार भंडलकर (मंत्रालय लिपिक) यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. सदरचा सत्कार समारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिभवन मंगळवार पेठ, फलटण याठिकाणी शनिवार, दिनांक 29/07/2023 सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे. अधिक माहितीसाठी पुढील भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा 9823109742 / 9921090196 / 8669023741कार्यक्रमास बहुसंख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



















