स्वातंत्र्य ,समता ,बंधुतेची शिकवण जगाला देणारे क्रांतीचे आद्यप्रनेते क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती फलटण मध्ये फुले - आंबेडकर प्रेमी मोठ्या उत्साहात करतात. फलटण येथील महात्मा फुले यांचा पुतळा खजिना हौदाशेजारी गेली पाच दशके सन्मानाने उभा आहे .फलटण सारख्या ऐतिहासिक भूमीत महात्मा फुले यांच्या विचारांना मानणारे असंख्य अनुयायी आहेत.
महात्मा फुले चौक व येथील फुले पुतळा फुले प्रेमींसाठी नेहमीच श्रद्धेचा व सन्मानाचा विषय राहिला आहे. येथील पुतळ्याभोवती असणाऱ्या सुरक्षा भिंतीची चौथऱ्याची व मोडलेल्या फाटकाची दुरुस्ती करून येथील जागेचे सुशोभीकरण करण्यात यावे एवढी माफक अपेक्षा पालिकेकडून व प्रशासनाकडून फुले प्रेमी करतात परंतू या सध्या गोष्टी देखील पूर्ण होऊ शकल्या नाहीत त्यामुळे शेवटी फुले प्रेमींनी एकत्र येऊन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सवा आधी तात्पुरती डागडुजी केली आहे. विडणी येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाळे यांनी तत्परतेने तुटलेले गेट व इतर डागडुजी करून दिली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती व कार्यकर्ते जयंती उत्सव साजरा करण्यासाठी मेहनत घेत असताना पालिका प्रशासनाने चौकातील स्वच्छता फरशीची स्वच्छता पुतळा परिसराची स्वच्छता या माफक गोष्टी करायला हव्यात अशी अपेक्षा फुले प्रेमी करतात.
लवकरच महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या भोवतीची खराब झालेली फरशी ,बाजूचा चौथरा सुरक्षा रक्षक कठडा व इतर किरकोळ कामे करून पुतळ्याचे सुशोभीकरण करावे अशी विनंती फुले प्रेमींनी केली आहे.



















