सातारा दि.16 : मदरशामध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी, व उर्दू, या विषयाचे शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळामध्ये प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे, परिणामी विदयार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होवून त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल या दृष्टीने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा गंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्याची डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव मदरशांनी दिनांक 30 जून 2023 पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा करावा असे आवाहन , जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांनी केले आहे.



















