सातारा शहरात घरपोच विक्रीकरीता भाजीपाला, किराणा माल, दुध, फळे विक्रेत्यांची प्रथम यादी सातारा नगरपरिषदेच्या फलकावर डकविण्यात आली असुन यादीमधील विक्रेत्यांनी घरपोच विक्रीचे परवाने सातारा नगरपरिषदेच्या कोरोना कक्षातून प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी केले आहे.
सातारा : जिल्हाधिकारी यांनी सातारा शहरातील सर्व किराणामाल, भाजीपाला, फळे, दुध, खाद्य पदार्थ, तसेच आदेशात नमुद इतर सर्व दुकाने बंद करुन घरपोच विक्री करणेबाबत आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार सातारा शहरात घरपोच विक्रीकरीता भाजीपाला, किराणा माल, दुध, फळे विक्रेत्यांची प्रथम यादी सातारा नगरपरिषदेच्या फलकावर डकविण्यात आली असुन यादीमधील विक्रेत्यांनी घरपोच विक्रीचे परवाने सातारा नगरपरिषदेच्या कोरोना कक्षातून प्राप्त करुन घ्यावेत. तसेच ज्या विक्रेत्यांची नावे यादीमध्ये नाहीत व ज्यां विक्रेत्यांना वर नमुद मालाची घरपोच विक्री करावयाची आहे त्यांनी आपले अर्ज 2 दिवसांत नगरपरिषदेमध्ये जमा करावेत, त्या संबंधीचे सुधारीत आदेश पारीत करण्यात येतील. लोकांनी घराबाहेर न पडता घरपोच विक्री करणार्या विक्रेत्यांकडुन वरील साहित्य खरेदी करावे, असे आवाहन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी केले आहे.
दरम्यान, यामुळे व्यापार्यांना दोन दिवसांत अर्ज करण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. त्यानंतर नागरिकांना आपापल्या परिसरातील व्यापार्यांचे फोन नंबर्स मिळवावे लागणार आहे. तसेच व्यापार्यांनाही ग्राहकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी ऑनलाईन संपर्क ठेवावा लागणार आहे. महिन्याचा किराणा भरणार्या बहुतांश लोकांची पहिल्याच आठवड्यात किराणा दुकानांमध्ये मोठी गर्दी होत असते. ही गर्दी टाळली जाणार असली तरी नागरिकांचीही गैरसोय होणार आहे.