फलटण शहरासह फलटण तालुका उद्या बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी बंद करण्याचे आवाहन समस्त जैन समाजाचे वतीने करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे, झारखंड येथील श्री सम्मेद शिकरजि ही जैन धर्मियांची काशी मानली जाते. या ठिकाणी सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. याच्या निषेधार्थ समस्त जैन समाजाच्या वतीने निषेध व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारचा निषेध म्हणून उद्या बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी फलटण शहरासह तालुक्यातील सर्वांनी बंद पाळून शासनाचा निषेध करण्याचे आवाहन जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
या संदर्भात उद्या बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता फलटण शहरातून जैन समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.