विजयपूरच्या (कर्नाटक ) ज्ञानयोगाश्रमाचे देवता, परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी आज अनंतात विलीन झाले. काही दिवसापासून ते आजारी होते. ते 81 वर्षाचे होते.त्यांच्या निधनाची बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला.
20 जून 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली होती.
अध्यात्मिक गुरु व प्रेरणादायी वक्ता म्हणून श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांची जगभरात ओळख होती.
आपल्या प्रवचनातून मानवजातीच्या उद्धारासाठी झटणाऱ्या श्रींची सेवा उत्कृष्ट आणि अद्वितीय आहे. त्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.



















