फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यामध्ये 126 गावांमध्ये 161 रेशन धान्य दुकाने असून त्यामधील 39472 पात्र लाभार्थी कुटूंबाना सोमवार दि.6/11/2023 पासून दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा. वाटप सुरु झाले आहे. यामध्ये एक लिटर तेल एक किलो साखर, अर्धा किलो चणाडाळ, अर्धा , किलो मैदा, अर्धा किलो रखा व अर्धा किलो पोहे असे एकूण 6 जिनस एका विशिष्ट प्रकारच्या कॅरिबॅगमध्ये भरून लाभार्थ्यांना केवळ 100 रुपयांत उपलब्ध करुन दिला जाणार आहेत.
यापूर्वी गौरी गणपती सणासाठी आनंदाचा शिधा फलटण तालुक्यातील 39538 पात्र लाभार्थ्यांना मिळाला होता त्यामध्ये 100/- रुपयांत एक किलो साखर एक लिटर तेल एक किलो चणाडाळ व एक किलो रवा इतकेच चार जिन्नस होते मात्र यावेळेस रवा आणि मैदा हे जिन्नस यात वाढवले आहेत.
गौरी गणपती सणानिमित्त प्राप्त सर्वच्या सर्व 39538 आनंदाचा शिधा किटचे वाटप लाभार्थ्यांना करुन फलटण तालुका सातारा जिल्ह्यात आघाडीवर होता व सातारा जिल्हा संपूर्ण राज्यात यात आघाडीवर होता. यामध्ये तालुका व जिल्ह्यातील पुरवठा विभागाचे कर्मचारी आणि रास्तभाव दुकानदारांचा सहभाग हा उत्साहवर्धक होता तरी दिवाळीच्या सणावेळी देखील प्राप्त सर्वाच्या सर्व 39742 आनंदाचा शिधा किटचा लाभ हा सर्व पात्र लाभार्थ्यांनी दिवाळीच्या सणापुर्वी घेऊन आपला फलटण तालुका आणि सातारा जिल्हा हा राज्यात पुन्हा आघाडीवर यावा यासाठी सर्वांचा हातभार आवश्यक आहे.तसेच याबाबत कोणत्याही लाभार्थ्यांस कोणतीही तक्रार अथवा शंका अथवा अडचण असलेस त्यासाठी तहसील कार्यालय फलटण येथे कार्यालयीन वेळेत डॉ. अभिजीत जाधव तहसिलदार फलटण, श्री. नामदेव काळे महसूल नायब तहसिलदार फलटण अथवा श्री. मनोज काकडे पुरवठा निरिक्षक फलटण यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन तहसील कार्यालय फलटण यांचे तर्फे करणेत येत आहे.