Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या करोना योद्ध्यांना मसालाकिंग धनंजय दातार यांनी पाठवली हापूस आंब्यांची भेट

टीम : धैर्य टाईम्स
दुबईस्थित ‘अल अदिल’ समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी या करोना योद्ध्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी त्यांना हापूस आंब्याच्या पेट्यांची भेट पाठवली. तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक धनश्री पाटील यांच्या माध्यमातून या सर्व करोना योद्ध्यांचा सत्कारही केला.

मुंबई :  कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाने मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील १५० हून अधिक स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव नुकताच अनोख्या पद्धतीने करण्यात आला. दुबईस्थित ‘अल अदिल’ समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी या करोना योद्ध्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी त्यांना हापूस आंब्याच्या पेट्यांची भेट पाठवली. तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक धनश्री पाटील यांच्या माध्यमातून या सर्व करोना योद्ध्यांचा सत्कारही केला.

पुणे शहर, परिसर व आसपासच्या तालुक्यांत करोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे हिंदू व मुस्लिम स्वयंसेवक प्रामुख्याने मूळनिवासी मुस्लिम मंच (येरवडा), कैलास स्मशानभूमी कामगार गट, उम्मत संस्था व वैकुंठ स्मशानभूमीतील स्वरुपवर्धिनीचा गट यांच्या माध्यमातून अविरत सेवा देत आहेत. करोना साथीच्या काळात आरोग्यसेवा आणि आपत्कालीन सेवा देणाऱ्या अन्य घटकांचे कौतुक झाले, परंतु अनेक अडचणी सहन करत अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या अंत्यसंस्कार स्वयंसेवकांच्या वाट्याला साधी प्रशंसाही आली नव्हती. या लोकांचा उचित गौरव व्हावा या हेतूने धनश्री पाटील यांनी दुबईस्थित डॉ. दातार यांच्याशी संपर्क साधला. समाजसेवेची आवड असणाऱ्या डॉ. दातार यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. सध्याच्या स्थितीत पुण्यात प्रत्यक्ष येणे शक्य नसल्याने डॉ. दातार यांनी या स्वयंसेवकांसाठी कोकणातून हापूस आंब्याच्या पेट्या मागवून घेतल्या व त्यांचे वितरण हे स्वयंसेवक काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन करण्यात आले.याकामी मूळनिवासी मुस्लिम मंचाचे सबीर शेख, कैलास स्मशानभूमी कामगार गटाचे ललित जाधव, उम्मत संस्थेचे जावेद खान व स्वरुपवर्धिनी संघाचे अविनाश धायरकर यांचे सहकार्य लाभले.

या अनोख्या उपक्रमाविषयी बोलताना धनश्री पाटील म्हणाल्या, की “कोरोनाबाधित मृतदेहांवर एकही रुपया न घेता अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवकांचे काम व योगदान समाजापुढे येणे मला गरजेचे वाटले. या योद्ध्यांनाही त्यांचा प्रथमच कुणीतरी सत्कार करत असल्याचे पाहून खूप आनंद झाला. हे स्वयंसेवक जात-धर्म न बघता सर्व मृतदेहांवर त्यांच्या त्यांच्या धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्काराचे काम बांधीलकीने व आत्मीयतेने करतात. रुग्णालयांतील बेवारस मृतदेहांवरही ते अंत्यसंस्कार करतात. डॉ. दातार यांनी पाठवलेल्या भेटीने तसेच सत्काराने त्यांनाही आपलेसे वाटले. आमच्यासाठी त्यांनी कामातून वेळ काढून इफ्तार मेजवानीचेही आयोजन केले, हे आमच्यासाठी भारावून टाकणारे होते.”

करोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करताना येणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकताना कैलास स्मशानभूमी कामगार गटाचे ललित जाधव म्हणाले, की गेले वर्षभर आम्ही रात्रंदिवस या कामात व्यग्र आहोत, परंतु सध्याची साथीची लाट तीव्र असल्याने स्मशानभूमीत येणाऱ्या कोरोनाबाधित मृतदेहांची संख्या रोज वाढत आहे. ओघानेच आमच्यावरही कामाचा खूप ताण येत आहे. सतत पीपीई किट घालून सज्ज राहणे, मृतदेहांवर विनाविलंब अंत्यसंस्कार करणे व त्याचवेळी स्वतःलाही सुरक्षित राखणे हे आव्हान आहे. आमच्या कामातील अडचणी समजून घेऊन सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे, एवढीच आमची अपेक्षा आहे.

 

उम्मत संस्थेचे ५० स्वयंसेवक पुण्याच्या आसपासच्या तालुक्यांतही जाऊन अंत्यसंस्काराचे काम करतात. मुस्लिम स्वयंसेवकांचा सध्या रमजानकाळात कडक उपवास असतो मात्र तहानभुकेची पर्वा न करता ते कर्तव्यनिष्ठेने कामात व्यग्र राहतात. रमजानच्या पवित्र महिन्यात माणुसकी व मदतीला फार महत्त्व असते, असे नमूद करुन उम्मतचे जावेद शेख यांनी डॉ. दातार यांच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. धनंजय दातार म्हणाले, की करोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवकांच्या धैर्याला आणि सेवासमर्पिततेला तोड नाही. करोना शब्द उच्चारताच लोक घाबरतात आणि लांब राहतात, परंतु हे स्वयंसेवक मात्र जीव धोक्यात घालून रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. हे थोर काम आहे. मी या उपक्रमात फार काही मोठे केलेले नाही. पुण्यातील करोना योद्ध्यांच्या जीवनात थोडा गोडवा आणला इतकेच. असेच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यास मी व माझा उद्योग समूह कटिबद्ध राहू.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER