Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

सर्व समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरावी ही  काळाची गरज – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फुले एज्युकेशन तर्फे ३६ वा सत्यशोधक विवाह फलटण मध्ये शानदारपणे संपन्न
टीम : धैर्य टाईम्स
महात्मा फुले यांनी कठीण काळात सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी अनेक सत्यशोधक विवाह लावले ते कार्य आज विधीकर्ते रघुनाथ ढोक आपलेच परिसरातील महाराष्ट्र व इतर राज्यात लावत आहेत.पुढे राजे म्हणाले की कोकाटे जाधव प्रमाणे यापुढे सर्व समाजाने  सत्यशोधक समाजाची कास धरत सत्यशोधक पध्द्तीने विवाह लावावेत

फलटण:  फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे जागतिक पर्यावरण दिनी, रविवार  दि.5 जुन2022 रोजी दुपारी 2 वाजता सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण  यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांचे साक्षीदार म्हणून सही घेऊन सत्यशोधक पै. उदय कोकाटे आणि सत्यशोधिका सायली जाधव यांना संस्थेच्या वतीने  थोर समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम व सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र देण्यात आले. हा सोहळा हजारो जनसमुदायाच्या साक्षीने मोठ्या दिमाखात सजाई गार्डन , फलटण येथे पार पडला.

यायेळी संजीवराजे म्हणाले की महात्मा फुले यांनी कठीण काळात सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी अनेक सत्यशोधक विवाह लावले ते कार्य आज विधीकर्ते रघुनाथ ढोक आपलेच परिसरातील महाराष्ट्र व इतर राज्यात लावत आहेत.पुढे राजे म्हणाले की कोकाटे जाधव प्रमाणे यापुढे सर्व समाजाने  सत्यशोधक समाजाची कास धरत सत्यशोधक पध्द्तीने विवाह लावावेत ही काळाची गरज असून त्यामुळे नक्कीच अंधश्रद्धा  कर्मकांड कमी होण्यास मदत होईल,असे देखील म्हंटले.

आमदार दीपक चव्हाण म्हणाले की महात्मा फुले यांच्या विचाराचे अनुकरण  करीत समाजसेवक कोकाटे यांनी सर्व समाजाला दिशा देणारा हा समारंभ अनुकरणीय असा घडविला त्याला साथ जाधव परिवाराने दिला त्यामुळे अनिष्ठ रूढी परंपरेला छेद बसला याबद्दल दोन्ही परिवाराचे त्यांनी अभिनंदन केले.

या प्रसंगी सामाजिक वनीकरणाचे अधिकारी सौ .हर्षा जगताप ,फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते अशोक जाधव ,माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड ,सातारा जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसे, चौधरवाडीचे सरपंच चौधरी मंडम, प्रगतशील शेतकरी दीपक भोसले , ग्रंथ  मित्र बाबासाहेब यादव, प्राचार्य सुधीर इंगळे ,मुंबई मार्केट कमिटीचे संचालक राजाराम पवार ,आदर्श बहुजन  शिक्षक संघाचे अध्यक्ष जयवंत तांबे , उपाध्यक्ष राजेश बोराटे , बापु गायकवाड ,पत्रकारसंघाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भागवत व सत्यशोधक चळवळीचे अनेक कार्यकर्ते मान्यवर मडळी उपस्थित होती. 

या कार्यक्रमाचे सुरवातीला मुकुंदराव काळोखे यांनी संस्थेची व वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती देत सातत्याने प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवीत असतो म्हणूनच आज हा सोहळा पहाण्यासाठी मोठी व दर्दी गर्दी जमा झाली आहे, त्यामुळे नक्कीच लोकांमध्ये जागृती होईल . तर डॉ .सुरेश उबाळे यांनी सत्यशोधक विवाहाबाबत  व पहिला सत्यशोधक विवाह महात्मा फुले  यांनी लावला त्याची माहिती दिली. यावेळी सायली व उदय यांनी प्रथम महापुरर्षाचे विचार आचार आत्मसात करून प्रसार करणार म्हणून मशाल पेटवली त्याला आईवडील यांनी साथ देतील म्हणून त्या मशालीत तेल टाकले  
त्यांनतर भारताचे सविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय हातात घेऊन पुलाच्या पायघड्यावरून ,पारंपरिक सनई,तुतारी,डपली वादन करीत  आगमन केले आणि  महात्मा व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण केला तर दोघांचे आईवडील यांनी छत्रपती शिवाजी महाराज . लोकमाता अहिल्याराणी , क्रांतीकारी उमाजी नाईक आणि घटनेचे शिल्पकार  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार घातला. यावेळी आई वडील व मामामामी यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने मान्यवराचे हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.तर कु.सलोनी आणि प्रा.सतीश आडेकर यांनी महात्मा रचित मंगलाष्टकं व  काव्याचे गायन करून या सोहळ्यास उंची आणली म्हणून त्यांचा देखील जेष्ठ पत्रकार राजेंद्र भागवत यांचे हस्ते  सन्मानप्रमाणपत्र देऊन आभार मानले. 

कोकाटे जाधव परिवाराने सर्वाना येताना गुलामगिरी आणि शिवाजी कोण होता हे ग्रंथ तर जाताना कोंणाला अंजीर, सीताफळ , आवळा , व पेरू अशी फळझाडे भेट दिली त्यामुळे परिसरात व सभामडपात  या आदर्श विवाहाची, तसेच  पर्यावरण दिनाची  चांगलीच चर्चा रंगली होती. 

हा सत्यशोधक विवाह विधीकर्ते फुले एज्युकेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी नेहमीप्रमाणे महात्मा फुले यांचे वेशभूषेत मोफत लावला. तर मोलाचे सहकार्य आयोजक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक विचारमंच,  चौधरवाडी  तसेच पाडेगाव सामाजिक विकास फौंडेशन चे सर्व पदाधिकारी व गिरीश बनकर , प्रशांत ढावरे ,सूत्रसंचालन पत्रकार शशिकांत सोनवलकर यांनी केले. जागतिक पर्यावरणाची माहिती देत उद्देशिका वाचन एकपात्री प्रयोगकार प्रा.शुभागी शिंदे फलटणकर यांनी केले आणि शेवटी आभार तुकाराम कोकाटे यांनी मानले. या प्रसंगी अन्नाची नासाडी होती म्हणून तांद्ळ ऐवजी अक्षता म्हणून सुगंधी पुलाच्य पाकळ्या वापरण्यात आले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER