Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

जिल्हा बँकेला 2020-21 मध्ये निव्वळ 65 कोटी नफा

चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती 
टीम : धैर्य टाईम्स
संपूर्ण देशामध्ये सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2020-21 या वर्षात 107 कोटी 36 लाख इतका करोत्तर नफा झाला असून निव्वळ नफा 65 कोटी झाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. 

सातारा : संपूर्ण देशामध्ये सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2020-21 या वर्षात 107 कोटी 36 लाख इतका करोत्तर नफा झाला असून निव्वळ नफा 65 कोटी झाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ना. रामराजे नाईक-निंबाळकर, सुनील माने, शिवरुपराजे नाईक-निंबाळकर, अनिल देसाई, नितीन पाटील, दत्तानाना ढमाळ, कांचन साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले की, शेतकर्‍यांची बँक तसेच जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख व ख्याती संपूर्ण देशात आहे. बँकेला चालू आर्थिक वर्षात 149 कोटी 22 लाख कर पूर्व नफा झालेला आहे. बँकेने या वर्षामध्ये आगाऊ आयकर रु. 23 कोटी 63 लाख भरणा केला आहे, शासन व्याज येणे रू. 14 कोटी 59 लाख जमा केले आहे व सोसायटी सक्षमीकरण व्याज रिबेट रु. 3 कोटी 63 लाख इतका खर्च होवून करोत्तर नफा रु.  107 कोटी 36 लाख झाला आहे. बँकेच्या ठेवी 8577 कोटी 56 लाख तर 5562 कोटी 76 कर्जे असून संमिश्र व्यवसाय 14140 कोटी 32 लाख इतका झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे सरकारी कर्जरोखे आणि बँकांमध्ये सुरक्षित गुंतवणूक 3975 कोटी 69 लाख केली असून 23 कोटी 63 लाख आयकर भरला आहे. तसेच बँकेचा एनपीए केवळ 0.17 टक्के असून निव्वळ अनुत्पादक कर्ज गत 13 वर्षे शुन्य टक्के आहे.

आ. शिवेंद्रराजे पुढे म्हणाले की, बँकेने शेतकरी सभासदांसाठी विविध तरतुदी व योजना केल्या आहेत. 1 ते 9 लाख पर्यंतच्या पिक कर्जावर दोन टक्के व्याज परतावा देण्यासाठी 6 कोटी 50 लाखाची तरतूद केली आहे. नियमीत कर्ज परतफेड कर्जदार सभासदांच्या अल्पमुदत कर्जावर दहा वर्षांपासून बँक परतावा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शेतकरी सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी दिलेल्या शैक्षणिक कर्जावर व्याज परताव्यासाठी 1 कोटी 1 लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे शिक्षण कालावधीत शैक्षणिक कर्ज शुन्य टक्के व्याजदराने प्राप्त होत असून अशा प्रकारचे कर्जपुरवठा करणारी जिल्हा बँक ही देशातील एकमेव बँक असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • बँकेने केलेल्या भरीव तरतुदी
    बँकेस 65 कोटी निव्वळ नफा, यात राखीव निधीसाठी 16 कोटीची तरतूद 
    शेती पत स्थैर्य निधीसाठी 9.75 कोटी
    इमारत निधीसाठी 1 कोटी, धर्मादाय निधीसाठी 5 लाख
    गुंतवणूक चढउतार निधीसाठी 3.61 कोटी 
    सोने भाव चढ-उतार साठी 50 लाख
    संशयित व बुडीत कर निधीसाठी 11 कोटी 87 लाख 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER