बुधवार दिनांक १२ एप्रिल २०२३ ते मंगळवार दिनांक १८ एप्रिल २०२३ ह्या सप्ताह काळात पुढीप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत,तरी सर्व भाविकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे आणि पुण्य प्राप्त करावे.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र मलटन, फलटण येथे बुधवार दिनांक १२ एप्रिल २०२३ पासुन स्वामी पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप, स्वामीचरित्र वाचन, प्रहर सेवा सुरू होणार आहे. तरी सर्व भाविकांनी स्वामी सेवेत उस्फुर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक १२एप्रिल - सकाळी ठीक १०: ०० वाजता गुरुचरित्र पारायण सुरु होणार असून दुपारी ४:०० वाजता हवन युक्त वेगवेगळे पाठ होतील.
वैशाख महिन्यातील होणाऱ्या स्वामी सेवेला अनन्य साधारण महत्त्व आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त सेवेत सहभागी व्हावे असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सकाळी ठीक ७.०० वाजेपासुन मंदिरात अखंड नामजप, स्वामी चरित्र वाचन आणि वीणा वादन सुरू होणार आहे तर
सकाळी ठीक १०.०० ते १२.०० या काळात गुरूचरित्र पारायण होईल. संध्याकाळी ४ वाजता रोज पुढीप्रमाणे हवन युक्त पाठ होतील --:
बुधवार - १२/४/२०२३ - स्वामी चरित्र पारायण .
गुरुवार - १३/४/२०२३ - स्वामी चरित्र पारायण.
शुक्रवार - १४/४/२०२३ - श्री दुर्गासप्तशती पाठ.
शनिवार - १५/४/२०२३ - श्री नवनाथ भक्तीसार.
रविवार - १६/४/२०२३ - श्री मल्हारी सप्तशती पाठ.
सोमवार - १७/४/२०२३ - श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम्.
मंगळवार - १८/४/२०२३ - सकाळी १०.३० च्या आरती नंतर हवनयुक्त स्वामी चरित्र सारामृत पारायण.
त्यानंतर दुपारी सुंदर असा किर्तनाचा कार्यक्रम होईल.
आणि रोज प्रदक्षिणा घेतली जाईल.(धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची......) तर दुपारी ४ ते ६ आबा महाराज मोहिते मुळीकवाडी स्वामी समर्थ महाराज चरित्र विषय कीर्तन होईल व सायंकाळी 7 ते 9 यावेळेस महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.