मुंबई : (११ एप्रिल)
आंबेडकरी चळवळ, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतीक रचनात्मकार्य गेल्या ४ दशकां पासून करणारे संघमित्रा व दत्ता अहिवळे यांना ना. रामदास आठवले यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती देऊन गौरविण्यात आले.
दलित पॅंथर मध्ये लाखो तरूणांनी देहभान विसरून समाजाच्या न्यासाठी आंदोलने केली. हे वर्ष दलित पॅंथरचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. वयोपरत्वे पॅंथर थकला असला तरी अनुभवाच्या जोरावर तो विविध क्षेत्रात कार्य करत आहे. अशा अखंड व अथकपणे समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकाचा जीवन गौरव होणे आवश्य आहे. असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते ट्रान्स ग्लोबल चेंबर ॲाफ काॅमर्स व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सास्कृतीक महोत्सव समिती, मुंबई यांच्यावतीने पॅंथर सुवर्णमहोत्सव व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण व जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी सातारा जिल्यातील फलटण येथे शेकडो बांधवांच्या सहकार्याने आंबेडकरी चळवळ, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतीक रचनात्मकार्य गेल्या ४ दशकां पासून करणारे संघमित्रा व दत्ता अहिवळे यांना ना. रामदास आठवले यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्था संस्थापक चंद्रकांत जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.