Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

संत शिरोमणी नामदेव महाराज पालखी, रथ आणि सायकल यात्रेचे फलटण मध्ये उत्साहात स्वागत

टीम : धैर्य टाईम्स

श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या दरम्यान कार्तिकी एकादशी आणि संत शिरोमणी नामदेव महाराज ७५२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून यावर्षी प्रथमच काढण्यात आलेल्या पालखी, रथ आणि सायकल यात्रेचे स्वागत येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात विविध क्षेत्रातील मान्यवर, किर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळे आणि स्त्री - पुरुष भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले.


       नामदेव समाजोन्नती परिषद, पालखी सोहळा पत्रकार संघ आणि भागवत धर्म प्रचारक संस्था यांच्या संयुक्त सहभागाने या पालखी, रथ आणि सायकल यात्रेचे आयोजन दि. ४ नोव्हेंबर ते दि. ४ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या रथा मध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज व गुरु गोविंदसिंह यांचे ग्रंथ, भागवत धर्माची पताका आहे. या यात्रेत सुमारे ११० सायकल यात्री सहभागी झाले असून त्यामध्ये बहुसंख्य सायकल यात्री ५०/५५ वर्षांहून अधिक वयाचे आहेत. १५ वयस्कर महिला सायकल यात्रींचा त्यामध्ये समावेश आहे.
    संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी  मोगल साम्राज्याच्या अंमल असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तीर्थक्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते तीर्थक्षेत्र घुमान (पंजाब) या सुमारे २३५० कि. मी. अंतराचा पायी प्रवास ६ राज्यातून करीत भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार तर केलाच त्याच बरोबर राष्ट्रभक्ती, संस्कृती, सदविचार या बाबीही लोकांना समजावून देत एक उत्तम सामाजिक काम केल्याचे यावेळी निदर्शनास आणून देत त्याच मार्गाने हा सोहोळा घुमान पर्यंत जाणार असल्याचे यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी सांगितले.
    क्रांतिसिंह नाना पाटील चौकात प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे संचालक श्रीमंत सत्यजितसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, ऋषिराज नाईक निंबाळकर, भाजपा तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी बेडके, भाजप अध्यात्म आघाडीचे अध्यक्ष अशोकराव जाधव, अमिरभाई शेख, मेहबुबभाई मेटकरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. रमेश आढाव, पत्रकार किरण बोळे, प्रसन्न रुद्र्भटे, ऍड. रोहित अहिवळे, शताब्दीकडे वाटचाल सुरु असलेल्या नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय उंडाळे व त्यांचे सहकारी पदाधिकारी, शिंपी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पद्माताई टाळकुटे व त्यांच्या सहकारी महिला यांनी स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन अध्यक्ष विजय उंडाळे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पद्मा  टाळकुटे, उपाध्यक्ष श्रीकांत मुळे, मोहन जामदार, सुभाष भांबुरे, राजेंद्र गाटे, मनीष जामदार, करण भांबुरे, सुनील पोरे, ज्ञानराज पोरे व समाज बांधवांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला
    त्यानंतर टाळ मृदंगाच्या निनादात भजनी मंडळींच्या विविध भजनाच्या तालासुरात सोहोळा क्रांतिसिंह नाना पाटील चौक, छ. शिवाजी महाराज चौक, बारामती चौक या मार्गाने नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिरात पोहोचला तेथे महिला व पुरुषांनी झिम्मा फुगडी खेळत मोठ्या उत्साहात सोहोळयाचे स्वागत केले. समाजातील मान्यवरांनी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पादुका पालखीतून काढून वाजत गाजत मंदिरात नेऊन ठेवल्या नंतर तेथे फलटण तालुका वारकरी संघाचे सचिव ह.भ.पं.केशव महाराज जाधव,डी. एम.घनवट,काटकर व त्यांचे सहकारी तसेच तरडगाव येथील भजनी मंडळ यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात सोहळ्याचे स्वागत केले. भजनी मंडळाची भजन सेवा आणि ह.भ.प. स्वामीराज भिसे यांची किर्तन सेवा झाली.

 

    पुणे येथील निवृत्त प्रा. डॉ. निरुपमा भावे या ७५ व्या वर्षी मोठ्या उत्साहाने सायकल यात्रेत सहभागी झाल्या आहेत.
    सोहोळयात सहभागी अर्चना बोगीलवार या नागपूर येथील ६० वर्षीय महिलेने यापूर्वी लेह लडाख सायकल वारी केली आहे.
 सेवानिवृत्त वैमानिक मिलिंद देशपांडे हे पुण्यातील ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सायकल यात्रेत सहभागी झाले आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER