भारतीय युवा पॅंथर पश्चिम महाराष्ट्र या संघटनेच्या महिला आघाडी सातारा जिल्हा अध्यक्षा सौ. मंगल भरत जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना फलटण, यांच्यावतीने प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त भारतीय युवा पँथर संघटनेकडून फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विराज भोसले उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सौ. मंगल भरत जाधव अध्यक्षा पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी, मंगेश इंगळे अध्यक्ष फलटण तालुका, अजय काळे उपाध्यक्ष फलटण तालुका, सीमा कुंभार महिला तालुका उपाध्यक्ष फलटण, पार्वती काळे महिला कार्याध्यक्ष फलटण तालुका, सोनू इंगळे, किरण इंगळे विकास रिटे, भाग्यवान वायदंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भारतीय युवा पॅंथर पश्चिम महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने भीम सैनिकांना डॉ. आंबेडकर चौक या ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी बॉटलचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सौ. मंगल जाधव यांना सन्मानित करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी
दरम्यान, महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात शासन दरबारी आवाज उठवून प्रसंगी मोर्चे आंदोलने काढत अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभा करणाऱ्या भारतीय युवा पॅंथर पश्चिम महाराष्ट्र या संघटनेच्या महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ. मंगल भरत जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना फलटण, यांच्यावतीने प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरवण्यात आले.