जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सातारा च्या प्राचार्या श्रीमती ज्योती दत्तात्रय मेटे यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन. त्या उत्तम प्रयोगशील शिक्षिका, उत्तम प्रशासक होत्या. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (फलटण) सातारा येथे प्राचार्य पदावर रुजू होण्या अगोदर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (वेळापूर) सोलापूर येथे प्राचार्य म्हणून सेवा केली आहे. त्यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद साताऱ्याच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, फलटण तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सातारा चे सर्व अधिव्याख्याता, विषय साधन व्यक्ती, कर्मचारी, फलटण तालुका समुह साधन केंद्राचे सर्व शिक्षक विषय तज्ञ व कर्मचारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.