Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

प्रशासनाच्या हाकेला उद्योजक, व्यवसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खटाव तालुक्यात एका दिवसांत जमले ५० ऑक्सिजन सिलींडर : ऑक्सिजन सिलींडरच्या तुटवड्याची गैरसोय दूर होण्यास मदत
टीम : धैर्य टाईम्स
तालुक्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या प्रसंगात ऑक्सिजन सिलेंडरसाठी तहसिलदार किरण जमदाडे यांच्याकडून विचारणा करण्यात आली. त्यावेळी आपण तातडीने कारखान्यावरील २० सिलेंडर उपलब्ध करून दिले. गेली २० ते २५ वर्षे आपण तालुक्यातील जनतेची प्रामाणिकपणे सेवा करीत आलो आहे. नियतीने संधी दिल्यास आगामी काळातही जनतेला चांगली सेवा देऊ. - प्रभाकर घार्गे (माजी आमदार)
वडूज : कोरोना बाधित रूग्णांना ऑक्सिजनची जाणवणारी कमतरता दूर करण्यासाठी ऑक्सिजन सिलींडर देण्याचे करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. त्यास खटाव तालुक्यातील उद्योजक तसेच लहान मोठ्या फॅब्रिकेशन व्यवसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रशासनाच्या हाकेला तालुक्यातील उद्योजक तसेच लहान मोठ्या फेब्रिकेशन व्यवसायिकांनी प्रतिसाद दिल्याने एका दिवसांत तब्बल ५० ऑक्सिजन सिलींडर जमा झाले. सद्या तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तालुक्यातील वडूज, औंध, खटाव, पुसेगाव, कातरखटाव, सातेवाडी आदी ठिकाणी आयसोलेशन सेंटर सुरू झाली आहेत. याठिकाणी काही आक्सिजन बेड उपलब्धही करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रूग्णांना जाणवणारी ऑक्सिजन बेडची अडचण दूर होण्यास मदतही झाली आहे. मात्र आयसोलेशन सेंटर व त्यामधील रूग्णसंख्या व त्यांना लागणारा ऑक्सिजन यांमुळे ऑक्सिजन सिलींडरचीच मोठी कमतरता जाणवत होती. त्यामुळे काही वेळा तालुक्यातील या आयसोलेशन सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलींडरचीच कमरतता जाणवत होती. त्यावर प्रशासनाने तालुक्यातील उद्योजक, लहान मोठे फेब्रिकेशन व्यवसायिक यांना त्यांच्याकडील ऑक्सिजन सिलींडर देण्याचे आवाहन केले. त्यानुसार प्रांताधिकारी जनार्दन कासार यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑक्सिजन सिलींडर जमा करण्याची मोहिम राबविली. तहसिलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, नायब तहसिलदार सिताकांत शिर्के, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, डॉ. संतोष मोरे, डॉ. सम्राट भादुले तसेच मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी यांनी याकामी योगदान दिले. आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या सिलेंडरची पाहणी व सुरक्षिततेची खातरजमा करून त्याचे सेफ्टी ऑडीट करून त्याचे प्रमाणपत्र दिले. प्रशासनाच्या या आवाहनास प्रतिसाद देत तालुक्यातील उद्योजक तसेच लहान मोठे फेब्रिकेशन व्यवसायिकांनी आपल्याकडील ऑक्सिजनचे सिलेंडर दिले. एकाच दिवसांत तब्बल ५० सिलेंडर जमा झाले असून ते सातारा येथे भरून घेण्यासाठी पाठविले जाणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील ऑक्सिजनचा तुटवडा कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. तालुक्यातील कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही देखील उद्योजकांसह व्यवसायिकांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER