
फलटण प्रतिनिधी : येथील दोशी गुणवरेकर चॅरिटेबल ट्रस्ट, जनसेवा डायग्नोस्टीक सेंटर, माऊली फाऊंडेशन (मुंबई), लायन्स क्लब, लायन्स मधोजी चॅरिटेबल आय हॉस्पीटल, फलटण ब्लड बँक, जैन सोशल ग्रुप, गुणवरे ग्रामपंचायत आदी संस्थांच्यावतीने गुणवरे येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीरास गाव परिसरातील रुग्णांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देवुन शिबीराचा लाभ घेतला.
या शिबीरात बालरोग, दंतरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, त्वचारोग अशा विविध प्रकारच्या आजारांची तपासणी व त्यावरील उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून रुग्णांना मोफत औषधे व चष्म्यांचे वाटप करण्यात आले. दरम्यान आयोजित रक्तदान शिबिरात जवळपास पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रारंभी शिबीराचे उद्घाटन हृदयरोग तज्ञ डॉ.जे.टी. पोळ, सरपंच सौ.अधिकाताई गावडे, दोशी गुणवरेकर चॅरिटेबल ट्रस्टचे मंगेश शेठ दोशी यांचेहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव, ज्येष्ठ विधीज्ञ विश्वनाथ टाळकुटे, मॅग फायनान्स कंपनीचे अनिल मोहोटकर, अमोल दोशी, डॉ.त्रिंबक गावडे, डॉ.तुकाराम गावडे, जे.पी. गावडे, उत्तम गावडे, सविता आढाव आदी प्रमुख उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मंगेश शेठ दोशी यांनी केले.
शिबीरात डॉ.राजस गांधी, डॉ.कल्याण नाळे, डॉ. गुंजन गांधी, डॉ. निखिल नाळे, डॉ.भारत पोंदकुले, डॉ.अशोक व्होरा, डॉ.चेतन गुंदेचा, डॉ.श्रीकांत गावडे, डॉ.तेजस गांधी, डॉ. प्रज्ञा गांधी, डॉ.मनोज गांधी, डॉ.आलोक गांधी, डॉ.चैत्राली खोमणे, डॉ. मिलींद दोशी, डॉ.इंद्रायणी नक्षणे, डॉ.सिद्धांत दोशी, डॉ.सुनिल गावडे, डॉ.आभिजीत गावडे, डॉ.अभिजीत गावडे यांचेसह विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सोसायटीचे सदस्य, ग्रामस्थ आदी सहभागी झाले होते.



















