Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतूकीत बदल

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 8 : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि 23 जून 2023 या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून  हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातुन सातारा जिल्हयात दि. 18 जून 2023  रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असून  त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन दि. 23 जून 2023 रोजी सोलापूर जिल्हयात जाणार आहे. या सोहळयानिमित्त जिल्ह्यात वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी केले आहे.

पालखी सोहळा हा निरा लोणंद फलटणमार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार असल्याने तसेच पालखी सेाहळयात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घडू नये, वाहतूक समस्या निर्माण होवू नये तसेच अनुचीत प्रकार घडू नये याकरिता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम  कलम 34 प्रमाणे प्राप्त अधिकारान्वये पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज व अत्यावश्यक सेवेतील (पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने) खेरीज करुन इतर सर्व वाहनांना  निरा लोणंद पंढरपूर मार्गावर दि.18 जून ते दि.23 जून 2023 या कालावधीत खाली नमुद केल्याप्रमाणे प्रवेश करण्यास मनाई करीत आहे.

दि. 17 जून 2023 रोजीचे  सकाळी 6.00 वा. पासून ते दि.21 जून 2023  रोजीचे 24.00 वा. पर्यंत फलटण येथून निरा लोणंदकडे येणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पूण्याकडे शिरगांव घाटातून वळविण्यात येत आहे.

दि. 17 जून 2023 रोजीचे रोजीचे  सकाळी 6.00 वा. पासून ते दि.20 जून 2023 रोजीचे 24.00 वा पर्यंत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणाऱ्या वाहनाखेरीज इतर वाहनांना बंदी करण्यात येत आहे.

दि. 17 जून 2023 रोजीचे  सकाळी 9.00 वा. पासून ते दि.22 जून 2023 रोजीचे दुपारी  13.00 वा. पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे.

दि. 17 जून 2023 रोजीचे रोजीचे 00.00 ते दि.21 जून 2023 रोजीचे 24.00 वा.पर्यंत फलटण ते लोणंद या मार्गांवरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.

दि.21 जून 2023 रोजीचे रोजीचे  00.00 पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे  16.00 वा. पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.

 दि. 21 जून 2023 रोजीचे  00.00 वा. पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे 24.00 वा. पर्यंत नातेपुते कडून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज, बारामती पुल येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.                                                                                  

 दि. 21 जून 2023 रोजीचे  00.00 पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे  16.00 वा. नातेपुते कडून फलटण मार्गे साताराकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे मार्गे दहीवडी -सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतुक नातेपुते-दहीगाव-जांब- बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.

दि. 21 जून 2023 रोजीचे 00.00 पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे 14.00 वा पर्यंत नातेपुते-वाई-वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे-शिंगणापुर-जावली-कोळकी- झिरपवाडी-विंचुर्णी-ढवळपाटी-वाठार फाटा मार्गे वळविण्यात येत आहे.

 दि. 22 जून 2023 रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड येथील मुक्कामी सकाळी  6.00 वा. मार्गस्थ होणार आहे. सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण-दहीवडी चौक- कोळकी- शिंगणापूर-तिकाटणे-वडले-पिंप्रद-बरड अशी वळविण्यात येत आहे.

पालखी सेाहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी ये जा करतील याची इतर वाहन धारकांनी नोंद घ्यावी.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER