जावळी तालुक्यातील मेरुलिंग मेढा घाटात रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास इर्टिका कार मेरुलिंग घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून पलटी झाली. या अपघातात तीनजण जागीच ठार तर पाचजण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
कुडाळ : जावळी तालुक्यातील मेरुलिंग मेढा घाटात रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास इर्टिका कार मेरुलिंग घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून पलटी झाली. या अपघातात तीनजण जागीच ठार तर पाचजण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मेरुलिंग गावातीच आठजण इर्टिका कारमधून रेशनिंग आणण्यासाठी जात होते. मेरुलिंग घाटात एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून कार पलटी झाली.
या अपघातात चालक शिवाजी जगन्नाथ साबळे वय 40 यांच्यासह तीन जण जागीच ठार झाले. अन्य पाचजण गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी जावून जखमींना बाहेर काढले व तात्काळ रुग्णालयात दाखल केले.