Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

विटा नगरपरिषदेच्या जीवनधारा कोविड सेंटरची विनाकारण बदनामी

प्रांताधिकारी भोर यांना दिले नगरसेवकांनी निवेदन
टीम : धैर्य टाईम्स

येथील नगरपालिका संचालित जीवनधारा कोविड सेंटर ची विनाकारण बदनामी केली जात आहे. ती थांबवावी, अशी मागणी करणारे निवेदन विटा नगरपालिकेच्या नगरसेवकांनी प्रातांधिकारी संतोष भोर यांना निवेदन दिले आहे. प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व तालुका प्रशासनाच्या आग्रहामुळे तालुका व‌ विटा शहरातील कोविड रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था व्हावी. यासाठी विटा नगरपरिषदेने पुढाकार घेऊन राज्य शासनाच्या शासकीय निवासी शाळेच्या इमारतीमध्ये जीवनधारा हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या माध्यमातून जीवनधारा कोविड रुग्णालयाची उभारणी केलेली आहे हे रुग्णालय उभा करीत असताना राज्य शासनाने निवासी शाळेची इमारत उपलब्ध करून देणे व नगरपरिषदेने त्यासाठी लागणाऱ्या कॉट्स,ऑक्सिजन वाहण्यासाठी लागणार्‍या पाईपलाईन,आवश्यकतेनुसार सर्व वीज फिटिंग,पाणीपुरवठा, ऑक्सिजन साठवणीसाठी लावणारे जम्बो सिलेंडर, रूग्णांसाठी उपचारासाठी लागणारे साहित्य व यासारख्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करून द्यायची जबाबदारी होती तर या ठिकाणी रुग्णांवर उपचारासाठी जीवनधारा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाच्या करारानुसार त्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक ते तज्ञ डॉक्टर, सहाय्यक डॉक्टर,नर्सिंग स्टाफ, सफाई कर्मचारी, नियुक्त करणे व दाखल होणाऱ्या रुग्णावर योग्य उपचार करून शासनाने जाहीर केलेल्या दर पत्रकानुसार रुग्णांकडून बिलाची वसुली करणे अशी जबाबदारी जीवनधारा रुग्णालय व्यवस्थापनाची होती या पार्श्वभूमीवर स्वतः आपण माननीय तहसीलदार साहेब व विटा नगर परिषदेच्या मुख्याअधिकारी यांच्या देखरेखीखाली व रुग्णालयाची उभारणी करून आपल्या उपस्थितीमध्ये या रुग्णसेवेचे लोकार्पण करण्यात आले. शासनाने जाहीर केलेल्या दर पत्रककाममध्ये जनरल वार्ड मधील विलगीकरण बेडसाठी 4000 तर ऑक्सिजन आयसीयू बेडला 7500 रुपये प्रति दिवसाकरता आकारणी करावी या सूचनेनुसार जीवनधारा व्यवस्थापनाने सर्व बेड ऑक्सिनेटेड असल्याने 7500 रुपये प्रतिदिन प्रमाणे व करारातील शर्तीनुसार 15 टक्के सूट देऊन आकारणी सुरू केलेली होती व नियमानुसार त्यांनी दररोजची दिले शासनाने नेमलेल्या ऑडिटर यांच्याकडे दाखल केली होती या पार्श्वभूमीवर आयसीयू नसताना 7500 प्रमाणे आकारणी करावी का असा प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नगर परिषदेच्या वतीने संपर्क करून याबाबत मार्गदर्शन घेण्यात आले व माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या सूचनेनुसार सर्व बेडना ऑक्सिजन सुविधा असली तरीही 4000 प्रमाणे आकारणी करण्याच्या सूचना जीवनधारा रुग्णालयात करण्यात आल्या व त्यांनीही तात्काळ या सूचनेनुसार तशी आकारणी सुरू करून प्रशासनाच्या सूचनेनुसार यापूर्वी आकारणी केलेल्या रुग्णांना जादा आकारणी झालेली रक्कम परत करण्यास सुरुवात केली बिलाची आकारणी व त्यानंतर निर्माण झालेला संभ्रम व आदेशानुसार अतिरिक्त रक्कम परत करणे या सर्व बाबी जीवनधारा रुग्णालयाच्या पातळीवरच्या होत्या त्यामध्ये अर्थात विटा नगर परिषदेचा काहीही संबंध नव्हता तरीही जादा आकारणी होत असले तर ती त्वरित थांबवून ज्यादा वसूल केलेली रक्कम त्वरित संबंधितांना रुग्णांना परत करावी यासाठी विटा नगरपरिषद कौन्सिल सदस्यांनी जीवनधारा रुग्णालय व्यवस्थापनाकडे तगादा लावला होता या सर्व पार्श्वभूमीवर ऑक्सिजन बेड असलेले 7500 लावावेत का अलगीकरण कक्षा सारखे 4000 लावलेत या बाबतीमध्ये सर्वांच्याच मनामध्ये संभ्रम असल्याने ही अनियमितता घडली आहे ही वस्तुस्थिती आहे व असा प्रकार केवळ जीवनधाराच नव्हे तर तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये घडलेला आहे व ही बाब निदर्शनास येताच त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली असताना दोन दिवसांपूर्वी माननीय तहसीलदार साहेबांनी एका स्थानिक दूरचित्रवाणीला दिलेल्या माहितीचा विपर्यास होऊन विनाकारण विटा नगरपरिषदेची खूप मोठी बदनामी झालेली आहे वस्तूता बिलाची आकारणी कशी केली जात आहे हे पहिल्या दिवसापासून पाहून त्याची तपासणी करण्याचे काम शासनाने नियुक्त केलेल्या ऑडिटर यांचे होते ते त्यांनी वेळेत न केल्याने किंवा कोणता दर लावावा या बाबतीमध्ये संभ्रम असल्याने म्हणा बिल आकारणी मध्ये अनियमितता झाली मात्र तहसीलदार शेळके यांच्या मुलाखतीचा विपर्यास करून विटा नगरपरिषदेची नाहक बदनामी करण्यात आल्याने याबाबत आपण प्रशासन म्हणून योग्य खुलासा वस्तुस्थिती प्रसारित करणे आवश्यक आहे .‌ यावेळी नगरसेवक किरण तारळेकर, फिरोज तांबोळी,सुभाष भिंगारदेवे,राहुल हजारे,विशाल तारळेकर, अविनाश चोथे,सचिन शितोळे,प्रशांत कांबळे,प्रताप सुतार, ज्ञानेश्वर शिंदे, भरत कांबळे,निलेश दिवटे,विनोद पाटील उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER