फलटण नगर परिषद फलटण व महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवार दिनांक 01 मार्च 2023 रोजी सकाळी 7 वाजता फलटण येथे महा श्रमदान अभियान आयोजित करण्यात आले आहे.
स्वच्छता श्रमदान या अभियानात सहभागी होऊन श्रमदानातून संबंधित परिसरातील स्वच्छता करण्यासाठी प्रभागातील माजी नगरसेवक सर्व नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती संस्था शाळा महाविद्यालय तसेच महिला बचत गट यांनी श्रमदानातून परिसर स्वच्छ करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी फलटण नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 7 वाजता प्रांत ऑफिस, तहसील कार्यालय परिसर, नवीन न्यायालय आणि फलटण शहर पोलीस ठाणे, बालाजी बाजार शोरूम शेजारील परिसर,दत्तनगर पर्यंत, बाणगंगा नदी घाट ते सातारा रोड बाणगंगा नदीपूल, रायगड हॉटेल ते दत्तनगर डावी बाजू पिरॅमिड चौक रिंग रोड ते नेहरूनगर या भागामध्ये हे महाश्रमदान अभियान आयोजित करण्यात आले आहे.



















