Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

पत्रकार विकास हाच - आमचा ध्यास : सुनील जगताप

शनिवार दि. 22 रोजी लोणीकाळभोला कार्यशाळा व स्नेह मेळावा ; पाचशे पत्रकार उपस्थित राहणार
टीम : धैर्य टाईम्स

उरुळी कांचन : महाराष्ट्र राज्य प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार मार्गदर्शन कार्यशाळा व स्नेह मेळावा शनिवारी (ता. २२) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पुणे व सातारा जिल्ह्यातील सुमारे पाचशे पत्रकार उपस्थित रहाणार आहेत. 'आपणच आपल्यासाठी' आणि 'पत्रकार विकास हाच आमचा ध्यास' या भूमिकेतून ही मार्गदर्शक कार्यशाळा व स्नेह मेळावा होणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुनिल जगताप यांनी दिली. 

मेळाव्याबाबत अधिक माहिती देताना सुनिल जगताप म्हणाले की, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी विद्यापीठातील राजकपूर सभागृहात शनिवारी (ता. २२) सकाळी दहा वाजता कार्यक्रम होणार आहे. पत्रकार मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दौंडचे आमदार राहुल कुल भूषविणार आहेत. 

यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती कराड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद आदी उपस्थित रहाणार आहेत. या वेळी 'पत्रकार व त्यांची सामाजिक जबाबदारी' या विषयावर संजय आवटे यांचे व्याख्यान होणार आहे. तर 'पत्रकारिता आणि न्यायिक बंधने' या विषयावर असीम सरोदे मार्गदर्शन करणार आहेत.

पत्रकारांचा स्नेहमेळावा दुपारी २.३० वाजता होणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी आयबीएन लोकमतचे वरिष्ठ पत्रकार विलास बडे, आमदार दत्ता भरणे, आमदार संजय जगताप, एमआयटी विद्यापीठाचे अध्यक्ष मंगेश कराड उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार अशोक पवार भूषविणार आहेत. 

पुणे प्राईम न्यूजच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन 

पत्रकारांच्या स्नेहमेळाव्यात दैनिक 'पुणे प्राईम न्यूज'च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन पत्रकार विलास बडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी मंगेश चिवटे यांचा आरोग्यदूत पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तर जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे यांना असामान्य कर्तृत्व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

पत्रकार मार्गदर्शन कार्यशाळा व स्नेह मेळाव्याला सर्व पत्रकारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सुनील जगताप यांनी केले. या वेळी कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, उपाध्यक्ष राजेंद्र काळभोर, सचिव संदीप बोडके, खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, प्रभाकर क्षीरसागर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER