सातारा, दि. 28 - सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्हयामध्ये कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात इयत्ता 8 वी ते 10 वी, 11 वी तसेच बी.ए. बी.कॉम, बी.एस्स. सी. प्रथम वर्ष पदवी व पदविका या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता मुला - मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश अर्ज भरण्यासाठी दि. 31 जुलै 2023 रोजीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश अर्ज वाटप करण्यात येत आहेत. गरजू विद्यार्थ्यांनी सदर वसतिगृहामध्ये आपला अर्ज भरण्याकरिता संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा यांचे कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा - 415003, दूरध्वनी क्रमांक : 02162-298106 येथे संपर्क साधावा.


















