सातारा दि.5 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.5 जुलै2023 रोजी दुपारी 12. वा.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची बालकांसाठी बालक-स्नेहा विधी सेवा आणि बालकांचे संरक्षण योजना, बाल न्याय अधिनियम 2015, मुलांचे हक्क आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयी जागरुकता शिबीर साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विभाग प्रमुख प्राध्यापक पाटील यांनी केले. त्यानंतर कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी प्रास्ताविक केले आणि मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर शिवाजी राऊत निवृत्त प्राचार्य यांनी मुलांचे हक्क या बरोबर त्यांची असलेली कर्तव्ये या विषयी माहिती दिली. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ या योजने विषयी माहिती देवून त्यासाठी कराव्या लागलेल्या कायद्यांची माहिती दिली व त्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना होणाऱ्या शिक्षा या विषयी सखोल माहिती दिली. त्याचप्रमाणे संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करताना तो कसा करावा, कधी करावा या विषयी माहिती दिली. त्यानंतर अध्यक्षीय मार्गदर्शन हर्षदा कावले, 4 थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, सातारा यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची बालकांसाठी बालक-स्नेहा विधी सेवा आणि बालकांचे संरक्षण योजना, बाल न्याय अधिनियम 2015 या विषयीची माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी या योजनेअंतर्गत बालकांना काय सुविधा मिळू शकतात, तसेच बालकांसाठीच्या संरक्षणकरीता निर्माण झालेल्या कायद्यांची माहिती दिली व तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची रचना व त्यामधून विविध मिळणारे लाभ या विषयी सखोल माहिती दिली. जनजागृती शिबीरे घेण्यामागचा प्राधिकरणाचा हेतू विशद करुन अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले. या कार्यक्रमामध्ये एकूण 148 विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. प्रमुख जिल्हा न्यायाधिश मंगला धोटे, यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यापक पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी दिलीप भोसले, लघुलेखक यांनी आभार प्रदर्शन केले.



















