लोणंदजवळील येथील शिरवळ रोडवर मरिआईची वाडी फाटा या ठिकाणी गोमांस घेऊन चाललेली गाडी गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पकडून लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
लोणंद : लोणंदजवळील येथील शिरवळ रोडवर मरिआईची वाडी फाटा या ठिकाणी गोमांस घेऊन चाललेली गाडी गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पकडून लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
लोणंद शिरवळ मार्गावर लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मरिआईची वाडी फाटा येथे निखील खंडागळे, ॠतिक पिसाळ व ओंकार गोळे या गोरक्षकांनी चालक जावेद अमन शेख वय 34 रा. कोंडवा खुर्द पुणे याच्या ताब्यातील एमएच 42 एम 8918 या पिकअप वाहनातून बेकायदेशीरपणे केली जात असलेली गोमांसाची वाहतूक सदर वाहनाचा संशय येऊन अडवल्यामुळे उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश माने, पोलिस नाईक मुळीक, पो हवा. दत्ता दिघे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून चालक जावेद अमन शेख यास अटक केली. तसेच गोमांस, भुईमूगाच्या भूशाच्या गोण्या, ताडपत्री व पिकअप वाहनासह सुमारे साडे चार लाख रूपये किमतीचा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला आहे. घटनेची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल श्रीनाथ कदम यांनी लोणंद पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.