सातारा दि. 30 : हिंदु, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, बौध्द, शीख आदी सर्व जाती धर्मातील मुला-मुलींच्या विवाहासाठी धार्मिक स्थळांकडून निधी संकलित करुन त्यांच्या जाती धर्मानुसार सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा-2023 आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी दि. 16 जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये इच्छुक विश्वस्तांनी त्यांची नावे कळविली आहेत. यामधून समिती गठीत करण्यासाठी दि. 2 फेब्रुवारी रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सहायक धर्मादाय आयुक्त सी. एम. ढबाले यांनी कळविले आहे.



















