कोळकी (ता. फलटण) येथे दहा दिवसीय श्रामणेर / बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक 27 एप्रिल ते शनिवार दिनांक 6 मे 2023 या कालावधीत करण्यात आले असून इच्छुकांनी या श्रामणेर शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय बौद्ध महासभा शाखा, सातारा जिल्हा पूर्वअंतर्गत भारतीय बौद्ध महासभा फलटण, यांच्या वतीने दहा दिवसीय श्रामणेर / बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन फुले - शाहू - आंबेडकर सामाजिक सभागृह बुद्ध विहार कोळकी, ता. फलटण येथे गुरुवार दिनांक 27 एप्रिल ते शनिवार दिनांक 6 मे 2023 या कालावधीत संपन्न होणार आहे. तरी 18 वर्षे पूर्ण झालेल्या बौद्ध बांधवांनी यामध्ये सहभागी व्हावे व बौद्ध धम्म प्रचार व प्रसारा करिता या शिबिराच्या माध्यमातून बुद्धधम्म समजून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी चैत्यभूमी मुंबई येथील भंते धम्मप्रियजिथेरो यांचे मार्गदर्शन लागणार आहे. शिबिरात सहभागी होताना आवश्यक साहित्य व गरजेची औषधे घेऊन दिनांक 27 रोजी दुपारी 3 वाजता मुंडन करून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी महावीर भालेराव, मोबाईल क्रमांक 99211 39224 यावर संपर्क साधावा.