फलटण प्रतिनिधी : येथील लूंबिनी बहुदेशीय संस्था, फलटण यांच्यावतीने मंगळावर पेठ फलटण येथील १० वी व १२ वी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला.
यावेळी शरीरसौस्ठव स्पर्धेमध्ये उज्वल कामगिरी केल्याबद्दल संजय मोरे व पी.एच. डी. प्राप्त केल्याबद्दल डॉ. प्रा. वर्धमान अहिवळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर गेली अनेक वर्ष सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल समाजभूषण या विशेष पुरस्कारणे दत्ता फणस अहिवळे यांना सन्माननीत करण्यात आले.
यावेळी मा. नगरसेवक सचिन अहिवळे मा. नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे, सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. सुपर्णा सनी अहिवळे, प्रियदर्शनी सावंत, माजी नगरसेवक मधुकर काकडे, जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, प्रा. प्रभाकर पवार, मुकेश अहिवळे, शाम अहिवळे, प्रा. स्वरूप अहिवळे, मंगेश काकडे, वंचित बहुजन आघाडीच्या फलटण शहाराध्यक्षा सौ. सपनाताई भोसले, हरीश काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
लूंबिनी बहुदेशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुणाल किशोर काकडे, गौतम अहिवळे, सुरज काकडे, वैभव काकडे, शिवेंद्र कांबळे, अभिलाष काकडे, हेमंत काकडे, सुशांत काकडे, अजय जगताप, सागर भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली कांबळे यांनी केले. तर आभार कुणाल काकडे यांनी मानले.