कोल्हापूर येथील स्वरतरंग संगीत प्रेमी मंच यांचा कराओके वर आधारित हिंदी आणि मराठी गीतांचा सदाबहार कार्यक्रम "जो तुमको हो पसंद" होणार आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटर, लायन्स क्लब ऑफ फलटण, क्रेडाई फलटण, जायंट्स ग्रुप ऑफ फलटण, रोटरी क्लब ऑफ फलटण, क्रेडाई (वूमेन्स विंग), लायन्स क्लब प्लॅटिनम, लायन्स क्लब गोल्डन, लिओ क्लब, इको क्लब, युथ विंग व BAI वूमेन्स विंग यांच्या सौजन्याने फलटण येथे कराओके कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर येथील स्वरतरंग संगीत प्रेमी मंच यांचा कराओके आधारित हिंदी आणि मराठी गीतांचा सदाबहार कार्यक्रम "जो तुमको हो पसंद" संपन्न होणार आहे.
प्रवेश मोफत असून स्वरतरंग संगीत प्रेमी मंच यांची सुरेल गाणी ऐकण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम सजाई गार्डन, जाधववाडी, फलटण येथे आज रविवार दिनांक 08 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 05 ते 08 वेळेत होणार आहे.