फलटण (प्रतिनिधी )
धुळदेव (ता.फलटण )येथे संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची 737 वी पुण्यतिथी सुवर्णकार समाज बांधव आणि ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली . पहाटे धुळदेव येथील संत सावता माळी मंदिरामध्ये असलेल्या श्री .नरहरी महाराजांच्या मुर्तीला आभिषेक घालण्यात आला. पुण्यतिथी निमित्ताने मंदिरात सप्त्याचे आयोजन करण्यात आले होते. गावामधील महिला व पुरुष यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. महिला व पुरुषांनी फुगडी , भजने , अंभगे, गात पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात टाळमृदूगाच्या गजरात साजरा केला. संत नरहरी महाराजांच्या नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.
सुश्राव्य किर्तनानंतर नरहरी महाराजांच्या मुर्तीची आरती करण्यात आली महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली .नगरसेवक अजय माळवे अशोक शेठ शहाणे धुळदेव चे सरपंच व्यंकटराव दङस , मार्केट कमिटी चे संचालक परशुराम फरांदे, पाणी पुरवठा सोसायटी चे चेअरमन माणिकराव कर्णे धुळदेव येथील सुवर्णकार समाजाचे जेष्ठ विलास नांदले अॕङ .हरिष महामुनी ,प्रा. संजय दिक्षित, राहुल महामुनी विकास नांदले शिंदे सर तसेच महिला पुरुष भाविक भक्त मंडळी , बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















