फलटण प्रतिनिधी -
फलटण नगरपरिषदेतील आस्थापना विभागप्रमुख अधिकारी श्रीमती साधना सुभाष पवार यांची रहिमतपूर नगरपरिषद येथे नुकतीच बदली झाली आहे.
श्रीमती साधना पवार या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून 2019 साली फलटण नगरपरिषदेन रुजू झाल्या. त्यांनी वसूली, जन्म-मृत्यू, आस्थापना विभाग प्रमुख म्हणून काम केले. जन्म-मृत्यु विभागप्रमुख म्हणून काम करताना झिरो पेंडन्सीचे उद्दिष्ट गाठले. नागरिकांना वेळेत सेवा देणे, कोव्हिड काळात जिवाची काळजी न करता मृत्यु दाखले देण्याच्या कामाबद्दल त्यांचे कौतुक झाले. गेल्या काही महिन्यापासून आस्थापना विभागप्रमुख म्हणून त्यांची कारकिर्द उल्लेखनिय ठरली. त्यांनी अनुकंपाची वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरण पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्न केले. सफाई कर्मचाऱ्यांना लाड-पागे नियुक्ती आदेश, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षिणार्थी यात सातारा जिल्हयात फलटण नगरपालिका पहिली ठरली.