फलटण प्रतिनिधी -
कष्ट व जिद्द मनात असेल तर कोणतेही ध्येय साध्य करणे अशक्य असे काहीच नाही असे उदगार सेवा निवृत्त वॉरंट ऑफिसर जे. एस. काकडे यांनी काढले ते फलटण येथील नगरसेवक सनी अहिवळे मित्र मंडळ व सुवर्णा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित फलटण तालुक्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उज्वल यश प्राप्त करत सहाय्यक पोलीस निरीक्षक पद मिळवलेल्या मान्यवरांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी नगरसेवक सनी अहिवळे, सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. सुपर्णा सनी अहिवळे, माजी नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे, मालोजीराजे शेती महाविद्यालयाचे उपप्राचार्य विकास काकडे, नवचैतन्य हायस्कूल व जुनियर कॉलेज गोंदवलेचे प्राचार्य सुहास अहिवळे, धैर्य टाईम्सचे संपादक व प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोरे, नागेशराव काकडे, सोपनराव जाधव माजी सरपंच उपळवे, महेश अहिवळे, पत्रकारा शक्ती भोसले, निलेश मोरे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना जे. एस. काकडे म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा माध्यमातून फलटण तालुक्यातील युवकांनी मिळवलेले यश हे त्यांच्या चिकाटीचे व मेहनतीचे फळ आहे. युवकांनी परिस्थितीचा बाऊ न करता मेहनतीच्या बाळावर यश प्राप्त करावे व आपले इच्छित ध्येय साध्य करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अजय सुनील मिसाळ, स्वप्नील हणमंत बनकर, प्रशांतराज सोपानराव जाधव, शंकेश्वर हणमंत अहिवळे, महेश बबन जगताप, सुवर्णा सागर लोंढे -गायकवाड, विक्रम गोसाजी काळे, सुप्रिया महादेव आढाव, यांनी 2020 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेतून उज्वल यश मिळवीत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसनी घातली. यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
यावेळी सोपानराव जाधव, विकास काकडे, सुधीर अहिवळे, यांनी आपले विचार व्यक्त केले. तर सत्काराला उत्तर देताना प्रशांतराज जाधव, सुप्रिया आढाव, विक्रम काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम सय्यद यांनी केले तर आभार हरीश काकडे यांनी मानले.