Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

सातेवाडी ग्रामस्थांचा आदर्श इतरांनी घ्यावा

जनार्दन कासार : सातेवाडीत लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन
टीम : धैर्य टाईम्स
‘सातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटरचा उपक्रम स्तुत्य असून अन्य गावांनीही याचा आदर्श घ्यावा,’ असे आवाहन परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी केले. 

वडूज : ‘सातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटरचा उपक्रम स्तुत्य असून अन्य गावांनीही याचा आदर्श घ्यावा,’ असे आवाहन परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी केले. 

सातेवाडी येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन आज परिविक्षाधिन प्रांताधिकारी कासार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे, उपसरपंच भाऊसाहेब बोटे, पोलीस पाटील विजया माने, गावकामगार तलाठी सुनील सत्रे, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. 

वडूज शहरापासून दोन किमी अंतरावर सुमारे 1 हजार 600 लोकसंख्येचे सातेवाडी गाव आहे. या ठिकाणीही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. ऑक्सिजनसाठी ठिकठिकाणी धावाधाव करूनही येथील एका रुग्णाला ऑक्सिजन अभावी जिवाला मुकावे लागले. ही बाब गावकर्‍यांना खटकू लागली. त्यामुळे किमान आपल्या गावातील रुग्णांना तरी वेळेत ऑक्सिजन मिळावा, अशी गावकर्‍यांत चर्चा झाली. गावच्या सरपंच वृषाली व त्यांचे पती विक्रम रोमन यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. ग्रामस्थांमध्ये चर्चा विनीमय झाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनीही पाठबळ दिले. त्यानुसार ग्रामस्थांनी आयसोलेशन सेंटरसाठी कॉट, गाद्या, बेडशीट, उशा, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य लोकसहभागातून आणले. येथील जिल्हा परिषद शाळेत आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी पाच ऑक्सिजन बेड व दहा आयसोलेशन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.

येथील मयूर बबन बोटे हे मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) याठिकाणी आहेत. गावात आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात येत असल्याचे त्यांना समाज माध्यमातून समजल्यानंतर त्यांनी त्यास भरीव सहकार्य केले. तसेच रोहित सचिन रोमन हे लष्करात सेवेत असणारे जवान गेल्या काही दिवसांपूर्वी सुट्टीनिमित्त गावी आले आहेत. जवान रोमन यांनीदेखील येथील जिल्हा परिषद शाळेच्या साफसफाई व स्वच्छतेसाठी दोन ते तीन दिवस अव्याहतपणे श्रमदान केले. तसेच गावातील युवकांनीही या श्रमदान मोहिमेत सहभाग नोंदविला. या आयसोलेशन सेंटरचे लोकार्पण आज करण्यात आले. 

कासार म्हणाले, ‘वाढत्या कोरोना बाधित रुग्णांमुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. अनेक रुग्णांना वेळेत ऑक्सिजन बेड मिळत नाहीत, अशा काळात रुग्णाला तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजन व आयसोलेशनची सोय या सेंटरचा माध्यमातून करण्यात आली आहे. सातेवाडी ग्रामस्थांनी सुरू केलेली ही संकल्पना स्तुत्य असून अन्य गावांनीही याचा आदर्श घ्यावा.’

सरपंच रोमन म्हणाल्या, ‘वाढत्या कोरोना बाधित रुग्ण संख्येमुळे प्रशासन यंत्रणेवर ताण येत आहे. रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे रुग्णांना किमान काही काळापुरता तरी ऑक्सिजन मिळावा, त्यांना जीवनदान मिळावे यासाठी गावामध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यातून व लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे.’

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER