फलटण प्रतिनिधी : 30 एप्रिल
फलटणची बहुचर्चित भुयारी गटर योजना शहराच्या विकासात भर टाकणारी असली तरी ती तयार करताना अनेक त्रुटी समोर येताना दिसतात. यापैकीच अक्षम्य अशी चूक कंत्राटदार व नियोजनातील अधिकारी यांचेकडून झाल्याचे दिसते .संपूर्ण शहरातील मल बाणगंगा नदीत आणले आहे यासाठी नदी पत्रात खूप मोठाले चेंबर तयार करण्यात आले आहे याने नदीच्या मूळ सौन्दर्याला बाधा आलीच आहे त्यातच यातील एक भला मोठा चेंबर फलटणकरांचे व मलटण करांचे श्रद्धास्थान असणारे बाणगंगा नदी काठचे श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दरवाजा समोर बांधला आहे.
हे गणेश मंदिर नेहमीच भक्तांच्या गर्दीने भरलेले असते बाणगंगा नदी काठी छोटस पण टुमदार असणारे हे मंदिर फलटणच्या वैभवात भर घालते परंतू काही दिवसांपूर्वी मंदिराच्या अगदी समोर भुयारी गटर योजनेचा चेंबर बांधला आहे त्यामुळे रस्त्यावरून होणारे गणेश दर्शन तर बंद झालेच आहे परंतू गटराचा चेंबर मंदिरा समोर बांधल्याने भक्त अतिशय नाराज आहेत.
एकूणच भुयारी गटर कामकाज बघता कुठे अपूर्ण तर कुठे अनियमित तर कुठे निकृष्ट असे आहे. कोणत्याही प्रकारचे नियोजपूर्वक काम होत नसल्याचा आरोप अनेक दिवसापासून होत असताना मंदिराच्या अगदी समोर भुयारी गटर योजनेचा चेंबर बांधला असल्याने नियोजन शून्य कामा कसे सुरू आहे याचा प्रत्यय येत आहे.
शहराच्या विकासासाठी भुयारी गटर आवश्यक आहेच परंतू ते करत असताना आशा गोष्टी टाळता येऊ शकत होत्या पाच दहा फूट चेंबर इकडे तिकडे सरकवला असता तर तो मंदिरासमोर आला नसता मंदिराच्या पवित्र्यात बाधा आणणारा हा चेंबर त्वरित काढून टाकावा व श्री गणेशाचे मुखदर्शन मार्ग मोकळा करावा तसेच तो मंदिरा जवळ न बांधतात इतरत्र हलवावा,: गणेशभक्त
गणेश मंदिरासमोर आलेला भुयारी गटरचा चेंबर पाहणी करून इतरत्र हलवण्यात येईल : मुख्याधिकारी संजय गायकवाड