Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

‘स्वातंत्र्यसैनिका’ची ‘लेक’ बनली पोलीस अधिकारी

अनफळेच्या जयश्री कांबळेंची खडतर कहाणी : गावातील पहिली महिला ‘पीएसआय’ होण्याचा मिळाला मान
टीम : धैर्य टाईम्स
सध्या शिक्षणाची गंगा खेडोपाड्यापर्यंत पोहोचल्यामुळे ग्रामीण भागातील मुलीही जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवताना दिसताहेत. यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे अनफळेतील स्वातंत्र्यसैनिकाच्या ‘लेकी’नं पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मारलेली मजल...त्याच जयश्री कांबळेंच्या खडतर कहाणीवर टाकलेली ही अल्पशी नजर...

विकी जाधव

सातारा : सध्या शिक्षणाची गंगा खेडोपाड्यापर्यंत पोहोचल्यामुळे ग्रामीण भागातील मुलीही जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवताना दिसताहेत. यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे अनफळेतील स्वातंत्र्यसैनिकाच्या ‘लेकी’नं पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मारलेली मजल...त्याच जयश्री कांबळेंच्या खडतर कहाणीवर टाकलेली ही अल्पशी नजर...                  

खटाव तालुक्यातील अनफळे गावातील एका सर्वसामान्य कुटुंबात 14 फेब्रुवारी 1989 रोजी जयश्री कांबळेंचा जन्म झाला. वडील स्वातंत्र्यसैनिक तर आई गृहिणी. जयश्री यांनी 1 ते 6वी पर्यंतच्या शिक्षणाचे धडे सातार्‍यातील युनियन स्कूलमध्ये गिरवले. नुकतीच जयश्री यांची प्राथमिक शिक्षण घेण्यास सुरुवात झाली होती. त्याचवेळी कांबळे कुटुंबीयांवर नियतीनं घाला घातला. म्हणजे जयश्री या लहान होत्या त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले अन् त्या पितृछत्राला पोरक्या झाल्या. तरीही त्यांच्या आईनं धीर न सोडता त्यांना आत्मिक पाठबळ दिलं. पुढे त्यांनी 7 ते 10वी पर्यंतचे शिक्षण मायणीच्या वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेत पूर्ण केले. नंतर 11 व 12वीचे शिक्षण भारतमाता ज्युनिअर कॉलेज, मायणी येथे घेतले. तसेच विटा येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या अध्यापक विद्यालयातून त्यांनी डी.एड.ची पदवी संपादन केली. त्यानंतर मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयातून बी.ए. पूर्ण केलं.

पोलीस खात्यात भरती होण्याचं स्वप्न लहानपणीच उराशी बाळगलेल्या जयश्री कांबळे यांनी 2016 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी इस्लामपूर येथील महाराष्ट्र अ‍ॅकॅडमीत प्रवेश घेतला. पुढे त्या योग्य नियोजन करून अभ्यास करत राहिल्या. दरम्यानच्या काळात घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांची आई सविता या दिवसरात्र शिवणकाम तसेच इतर कामे करून जयश्री यांना आर्थिक सहकार्य करत होत्या. अभ्यास करताना जयश्री यांना प्रत्येक क्षणी आईच्या खडतर कष्टाची जाणीव होत होती.

त्यातच त्यांच्या वडिलांनी सैन्यदलात सेवा केल्यामुळे त्यांच्या पोलीस होण्याच्या स्वप्नाला आणखी बळ मिळत गेलं. त्यावेळी त्यांनी ठरवलं कितीही कष्ट घ्यावे लागले तरी पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारायचीच. पुढे त्यांनी नव्या जोमानं नियोजनात्मक मेहनतीच्या जोरावर एमपीएससी मार्फत 2017 मध्ये घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाची परीक्षा दिली. त्यात त्या उत्तीर्ण ही झाल्या. पुढे 2018 मध्ये मुलाखत घेण्यात आली, त्यातही त्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर उत्तीर्ण झाल्या. नंतर पीएसआय परीक्षेचा अंतिम निकाल 8 मार्च 2019 रोजी जाहीर करण्यात आला. यामध्येही त्यांनी बाजी मारली. हे सर्व टप्पे पार करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. तरीही त्या न डगमगता मार्गक्रमण करत राहिल्या. दरम्यानच्या काळात त्यांना आई व दोन भावांची खंबीर साथ लाभली.

जयश्रीताई पुढे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ट्रेनिंगसाठी नाशिक येथील ‘महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकॅडमी’मध्ये 7 जानेवारी 2020 रोजी रुजू झाल्या. खरंतर पीएसआयचे ट्रेनिंग हे बारा महिन्यांचे असते. पण त्यांना हे ट्रेनिंग कोरोनामुळे पंधरा महिने करावे लागले. त्यांना या काळात प्रशिक्षणार्थी सोडले तर कुणाशीही भेटता येत नव्हते. तरीही त्यांनी शारीरिक आणि मानसिक कसोटीची परीक्षा पाहणारं हे खडतर ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केलं. त्यानंतर त्यांचा 30 मार्च 2021 शपथविधी घेण्यात आला. काही कालावधीनंतर म्हणजे 9 एप्रिल 2021 रोजी त्या इस्लामपूर पोलीस  ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्या.

अशाप्रकारे जयश्री कांबळे यांनी ग्रामीण पार्श्‍वभूमी असतानाही केवळ जिद्दीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाने अनफळे गावच्या मातीचा नव्याने सन्मान झाला आहे. त्यामुळे कांबळे यांचे हे खडतर व प्रेरणादायी यश ग्रामीण भागातील मुलींच्या स्वप्नांना नक्कीच बळ देणारे आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही..!

 

 


पॅशन असेल तर या...
खाकी वर्दीचे ग्लॅमर म्हणून फक्त झगमगाटाला भुलून या क्षेत्रात यायचे तर अजिबात येऊ नका. तुमच्यात पॅशन पाहिजे, सर्व प्रकारच्या लोकांचा सामना करण्याची तुमच्यात रग पाहिजे. चौकटीच्या पलीकडचे तडजोडीचे आयुष्य जगण्याची इच्छा असेल तरच या, अन्यथा दुसरे क्षेत्र निवडा, असे जयश्रीताई आवर्जून सांगतात.

माझ्या लेकीनं मी दिवसरात्र घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून स्वत: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींनीही प्रत्येक संकटाचा धैर्यानं सामना करून उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. 
- सविता कांबळे, जयश्रीची आई.

लहानपणी उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद वाटतो. यात आईने घेतलेले कष्ट व दोन भाऊ तसेच पती अन् सासरच्यांनी दिलेली खंबीर साथ मोलाची आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारू शकले. यापुढे ‘खाकी’ला शोभेल असेच उल्लेखनीय कार्य करून दाखवणार आहे.
- जयश्री कांबळे, पोलीस उपनिरीक्षक.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER