सातारा, दि. 21, (जि.मा.का.) – सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज भरण्याची मुदत दिनांक 31 मार्च, 2023 अखेर होती. या योजनेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे आणि स्वाधार योजनेचा अर्ज भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी दिनांक 14 जुलै 2023 पर्यंत शासनाने मुदतवाढ दिलेली आहे.
तरी सदर योजनेचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी कार्यालयाशी समक्ष संपर्क साधावा, असे आव्हान नितीन उबाळे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा 415003, दूरध्वनी क्रमांक : 02162-298106 येथे संपर्क साधावा.


















