फलटण प्रतिनिधी : क्राईम न्यूज
कुरेशी नगर येथे एका चारचाकी गाडीत गोवंशीय मासाचे तुकडे कत्तल केलेल्या जनावरांचे गोमांस विक्री करणे करता भरलेले आढळून आल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गाडी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यावेळी एकूण ५ लाख २५ हजार रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ६ रोजी ४:५५ वाजताचे सुमारास कुरेशी नगर फलटण येथील एक सिल्वर रंगाची टोयाटो इटी इटिऑस गाडी क्रमांक एमएच१२सीव्ही१६६० या वाहनात पाठीमागील सीटवर तसेच डिकीमध्ये २५ हजार रुपये किमतीचे अंदाजे २५० किलो वजनाचे काळे रंगाचे प्लास्टिकच्या कागदात भरलेले गोवंशीय मासाचे तुकडे कत्तल केलेल्या जनावरांचे गोमांस विक्री करणे करता भरलेले आढळून आले. गोमास व ५ लाख रुपये किंमतीची गाडी असा एकूण ५ लाख २५ हजार रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अनिल एकनाथ देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गाडी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पो.हवा.सोनवलकर हे करीत आहेत.