Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी :  

फलटण तालुक्यात मटका व्यावसाय जोमात सुरु असून मटक्याच्या अधीन गेलेल्या तरुणांचे संसार कोमात गेल्याचे विदारक चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. पोलिसांच्या छत्रछायेखाली अवैध व्यावसायाने जोर धरला असून चौका-चौकात खुलेआम मटक्याचा बाजार सुरु आहे. पोलिसांबरोबर अवैध व्यावसायिकांचे जाळे किती घट्ट जुळलेले आहे याचा प्रत्यय येथे येतो. या व्यावसायातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून पोलिसांकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यात मजुरांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यात तरुणांचीच संख्या जास्त आहे.


मात्र बहुतेक तरुण झटपट पैसे कमावण्याच्या नादात या खेळाच्या अधीन गेले असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर काहींचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अनेक तरुण हारजीतीच्या तणावाने इतरही व्यसनाच्या आहारी गेले आहेत. मटका चालवणारांना पोलिसांच्या आशीर्वादाने व्यवसाय मिळाला असला तरी या व्यवसायाच्या नादी लागलेले इतर व्यावसायिक मात्र बरबाद झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मटक्याच्या व्यसनाच्या अधीन गेलेल्या तरुणांच्या घरातील सदस्य मात्र चिंताग्रस्त आहे. मटका या जुगाराचे अल्पवयीन मुलांना मोठ्याप्रमाणात व्यसन जडले आहे. ऐन शिकण्याच्या वयात ही मुले मटका जुगाराच्या नादी लागल्याने अनेकांचे भवितव्य अंधातरी झाल्याचे जाणवते. मटका जुगाराच्या हारजीतीमुळे अनेक तरुणांना दारुचे व्यसन जडले असल्याने घरातील दररोज होत असलेल्या वादावादीमुळे संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहे.


फलटण शहत सध्या अवैध व्यावसायासाठी प्रसिद्ध होत चालले आहे. त्यामुळे बाहेरगावचे जुगार शौकिन लोकही कामधंदा न करता येथे येऊन दिवस दिवस बसत असतात. पोलिसांचा कायमच येथील अवैध व्यवसायाला वरदहस्त राहिल्याने अवैध व्यावसायिकांची मुजोरी सुरु असते. अलिकडच्या काळात सोशल मिडीयाचा वापर मटका जुगारासाठी केला जातो. मटका व्यवसायाला सोशल मिडीयामुळे चांगलेच बळ मिळाले असून पोलिसांपुढे हा व्यवसाय मोडीत काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सोशलच्या माध्यमातूनच मटका जुगाराचा खेळ खेळला जातो. तसेच अर्थिक व्यावहारही ऑनलाईनच होत असल्याने छुपे रुस्तुमांची संख्या वाढली आहे. यामुळे तरुणपिढी पूर्णपणे वाया जात असून खरंच पोलीस आपले अवैध व्यावसायिकांशी असलेले हितसंबध बाजूला ठेऊन हा अवैध व्यवसाय बंद होण्यासंबधी कारवाई करतील काय? की पहिले पाढे पंचावन्न चालू ठेवत आपल्या अकार्यक्षमतेचे दर्शन घडवतील, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER