Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ?

शहराला कार्यक्षम अधिकाऱ्याची गरज
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी :  


गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवनुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणां वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे. शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केल्या जात आहे. त्यामुळे सुसंस्कृत फलटण शहराला आता कार्यक्षम अधिकाऱ्याची गरज असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

 

बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील तरूण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणुन पान टपरी, चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते. मात्र, आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात जुगार, मटका, चक्री अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे. पान टपरी किंवा चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही, तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो असा त्यांचा समज आहे. त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेनेच अवैध धंदे उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. तरूणांनी मटका, चक्रीला स्वत:च्या उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे. घरून पाहिजे तेवढा पॉकेटमनी मिळू शकत नाही, घरून मिळालेल्या पॉकेटमनी मध्ये तरूणांच्या गरजा भागू शकत नाहीत़, यावर तरुणांनी उपाय शोधला असून, मटक्यावर पैसा लावून जादा पैसा कमावण्यात तरूण लागले आहेत. मटक्यावर तरूणांना सव्वा रूपयात शंभर रूपये मिळविता येत आहेत. क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून मटक्याचे गणित मांडले जात आहे. तरुणांसोबत शासकीय सेवेतील कर्मचारी देखील मटक्याच्या आहारी गेले आहेत. मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारी कडेही वळत आहे. 

 

या मटक्याच्या नादी लागुण कित्येक तरुण दिवसभर आकडे मोडीच्या गणिताचा अभ्यास करीत असतात. शहरात मटका दलालांनी मटका घेण्याचे कार्यालय लावलेले आहे. या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत. तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालविण्यात येतात. त्यानंतर मात्र, परिस्थिती जैसे थे असते. फलटण शहर पोलिस स्टेशन हद्दीत खुलेआम मटक्यासह इतर अवैध व्यवसाय सुरू आहेत. मात्र असे असतानाही या पोलिस ठाण्याकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता जिल्हा पोलिस अधीक्षक यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

 

मागील महिन्यात एसटी बस मध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील 13.80 मिली ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आज्ञताने जबरीने हिसकावले होते. तर अनंत मंगल कार्यालय येथूनही एक महिला चारचाकी गाडीतून उतरत असताना मंगळसूत्र हिसकावण्यात आले होते. तर किरकोळ चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. शहरातील अनेक गुन्हे लपविले जात आहेत. तर अनेक गुन्ह्यांची प्रेसनोट देखील वृत्तपत्रांना दिली जात नाही. 

 

मासिक टार्गेटमध्ये चेल्याचपाट्यावर कारवाई 

अवैध धंद्याबाबतची कल्पना पोलिस प्रशासनाला आहे. असे असताना अवैध धंद्यावर ‘मासिक टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी धाड टाकण्यात येते. या धाडीत पैसा, ‘चेल्याचपाट्या’ ला ताब्यात घेवून पोलिस कारवाईचा आव आणतात. त्यातून सर्व‘आलबेल’ असल्याचे भासवले जाते. प्रत्यक्षात मात्र, पोलिसांचे अवैध व्यावसायिकांशी संबंध हे त्यांना धंदा सुरू ठेवु देण्यासाठीच असल्याचे सर्वत्र बोललले जात आहे. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER