कोरोना महामारीमुळे बहुतांशी लोक स्वतःचा जीव मुठीत घेऊन घरी बसले आहेत. तर दुसर्या बाजूला काहीजण स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा पैकीच एक आहेत वडूज नगरपंचायतीचे शववाहिनेचे चालक मनोज पवार. त्यांनी रविवारी एकाच दिवशी सुमारे अडीचशे किलोमीटरचा प्रवास करत तब्बल 9 कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारास हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.
वडूज : कोरोना महामारीमुळे बहुतांशी लोक स्वतःचा जीव मुठीत घेऊन घरी बसले आहेत. तर दुसर्या बाजूला काहीजण स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा पैकीच एक आहेत वडूज नगरपंचायतीचे शववाहिनेचे चालक मनोज पवार. त्यांनी रविवारी एकाच दिवशी सुमारे अडीचशे किलोमीटरचा प्रवास करत तब्बल 9 कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारास हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.
पवार यांनी दि. 18 रोजी सकाळी मुख्याधिकारी माधव खांडेकर तसेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार सध्याची गंभीर परिस्थिती पाहता जवळपास 9 कोरोनाबाधित मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार पार पाडण्याकामी शववाहिका सारथ्य केले.
त्यांनी निरामय हॉस्पिटल 2 वेळा, मायणी ते म्हसवड 1 वेळा, मायणी ते दहिवडी 2 वेळा, औंध ते वडूज 1 वेळ तसेच निमसोड ते वडूज 1 वेळ असे तब्बल 7 वेळा असा त्यांचा दिवसभराचा प्रवास होता. न थकता, डोळ्यात अंजन घालून त्यांनी हे काम केले.
त्यांच्या या धाडशी कामगिरीचे परिसरात चांगलेच कौतुक होत आहे.