Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

इंधन भरून निघालेल्या टँकरला अपघातामुळे आग 

दीड लाखाचे नुकसान 
टीम : धैर्य टाईम्स
मुंबईहून कोल्हापूर याठिकाणी 24 हजार लिटर पेट्रोल-डिझेल भरून निघालेल्या टँकरचे पाठीमागील टायर फुटून लागलेल्या आगीमध्ये टँकरचे साधारणपणे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

खंडाळा : मुंबईहून कोल्हापूर याठिकाणी 24 हजार लिटर पेट्रोल-डिझेल भरून निघालेल्या टँकरचे पाठीमागील टायर फुटून लागलेल्या आगीमध्ये टँकरचे साधारणपणे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ही घटना सोमवार दि.19 एप्रिल रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान घडली. यावेळी टँकरला लागलेली आग आटोक्यात आणल्याने शिरवळकरांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी कि, मुंबई येथील रिलायन्स कंपनीच्या डेपोमधून गडहिंग्लज, कोल्हापूर याठिकाणी असणार्‍या पेट्रोल पंपावर चालक शामसुंदर प्रभू कोल्हे (वय 38 रा. लोणी काळभोर जि. पुणे) व दुसरा चालक विलास भगवान मोरे (वय 33, रा. चांदणी, जि. बीड) हे टँकर (क्र. एमएच 12-12-आरएन 6778) 14 हजार लिटर डिझेल तर 10 हजार लिटर पेट्रोल भरलेले घेऊन निघाले होते.

यावेळी शिरवळ, ता. खंडाळा हद्दीमधील फुलमळ्यालगत एका हॉटेललगत आला असता क्लिनर बाजूकडील पाठीमागे असणारा टायर फुटला. यावेळी चालक शामसुंदर कोल्हे याने टँकर साधारणपणे 75 मीटरपर्यंत ब्रेक दाबत टॅकर थांबवला असता फुटलेल्या टायरला अचानकपणे आग लागली.

यावेळी टँकरमधील आग विझविणार्‍या यंत्राने चालक शामसुंदर कोल्हे याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने रौद्ररुप धारण करत शेजारील टँकरचे सहा टायरही पेटले. त्यामुळे चालक शामसुंदर कोल्हे याने तात्काळ शिरवळ पोलीस स्टेशनला धाव घेत याची माहिती पोलिसांना दिली. शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे हे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे, राजू अहिरराव, पोलीस हवालदार आप्पासाहेब कोलवडकर, शिवराज जाधव, प्रशांत वाघमारे, संतोष ननावरे व होमगार्ड यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांसहित तर सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांनी घटनास्थळी पोलीस कर्मचार्‍यांसमवेत धाव घेत महामार्गावरील वाहतूक तत्काळ घटनास्थळापासून वळवली.

यावेळी भोर नगरपरिषदचे अग्निशमन दलाचे जवान हृषीकेश शेटे, आबा साबळे, अमीर अत्तार, रोहित देशमाने तसेच केसुर्डी एमआयडीसीतील एशियन पेन्ट्सच्या अग्निशमन दलाचे जवानांनी व एचआर व्यवस्थापक मनोज क्षीरसागर यांनी व वाई अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे, राजू अहिरराव, पोलीस हवालदार आप्पासाहेब कोलवडकर, शिवराज जाधव, प्रशांत वाघमारे, संतोष ननावरे, होमगार्ड यांच्यासह शिरवळ पोलीस कर्मचार्‍यांच्या सहकार्याने व सारोळा महामार्ग मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण रणदिवे व महामार्ग पोलीस कर्मचार्‍यांच्या सहकार्याने टँकरला लागलेली आग संपूर्णपणे आटोक्यात आणण्यात तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या दरम्यान यश मिळविले.

या घटनेची फिर्याद चालक शामसुंदर कोल्हे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे करत आहे. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER