फलटण प्रतिनीधी - बैलगाडा शर्यतीच्या मैदानावर बैलगाडी एकाच गटात पळवू नको असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून ९ जणांनी कोयता, काठी, हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, जाधववाडी,ता. फलटण, जि. सातारा येथील साईबाबा मंदिरासमोर दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वाढदिवसानिमीत्त भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानावर बैलगाडी एकाच गटात पळवू नको असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून फिर्यादी विजय बबन मदने (वय ३५ रा. उमाजी नाईक चौक, फलटण) यांना सुमारे ९ जणांनी कोयता, काठी, हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी मारुती पांडुरंग खोमणे, ऋषी तानाजी जाधव, विशाल विठ्ठल कडाळे, शामराव मदने, हणमंत शिवाजी जाधव, तेजस मारुती खोमणे व इतर तीन अनोळखी इसमांविरोधात (सर्व रा. कोर्हाळे खुर्द, ता. बारामती) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास म.पो.ना. पूनम तांबे करत आहेत.