फलटण | धैर्य टाईम्स २३ जानेवारी २०२५
महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी कायदा लागू आहे. मात्र फलटण शहरात होलसेल गुटखा विक्री करणारे आहेत जर यांच्यावर कारवाई केली तर संपूर्ण शहरातील गुटखा विक्री बंद होईल. तरी राजरोसपणे अवैध गुटखा विक्री लवकरात बंद करावी असा इशारा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांनी दिला असून गुटखा विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करावी अन्यथा २६ जानेवारी २०२५ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. सदरचे निवेदन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव व फलटण शहर पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांना दिले आहे.