काही दिवसापूर्वी फलटण शहरातील अनधिकृत अतिक्रमणावर हातोडा मारणारे मुख्याधिकारी निखिल मोरे कोणती कारवाई करणार असा सवाल आता फलटणकर विचारू लागले आहेत
फलटण | धैर्य टाईम्स |
फलटण नगरपालिका हद्दी मध्ये कोणत्याही प्रकारे फ्लेक्स अथवा होर्डिंग लावण्यास बंदी आहे मात्र याचा विसर पालिका प्रशासनाला इतका पडला आहे की काय त्याला कारणही तसेच आहे. फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांचा फोटो असलेल्या त्यांच्या उद्योग समुहाचा अनधिकृत होर्डींग फलटण शहरातील सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहा शेजारी झळकत आहे. या अनधिकृत होर्डिंग प्रकरणी आता माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले व त्यांच्या सद्गुरु उद्योग समूहावर मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी संबंधित होर्डिंगवर प्रकरणी कारवाई करून मोठा दंड वसूल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
काही दिवसापूर्वीच जिंती नाका येथे असणारे महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण तसेच स्व. वेणूताई चव्हाण यांचे स्मारक शिल्प एका संगणक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या जाहिरातीचे झाकून टाकले आहे यामुळे नागरिक संतप्त झाले होते. वृत्त पत्रातून यासंबंधी बातम्या प्रकाशित झाल्यानंतर तात्काळ संबंधित होर्डिंगवर कारवाई पालिका प्रशासनाने केली होती. त्यामुळे आता पालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता अनेकांचे डोळे लागले आहेत.
शहरात होर्डिंग व फ्लेक्स बंदी असताना गेली अनेक दिवस खाजगी संस्थेचे हे होर्डिंग पालिका अधिकारी व कर्मचारी यांना का दिसले नाही असा सवाल आता फलटणकर विचारू लागले आहेत.
यासंबधि मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.