फलटण | धैर्य टाईम्स |
सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज फलटण तालुक्याचा दौरा केला यावेळी मा.खा. रणजितसिह नाईक निंबाळकर यांचे निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार सचिन पाटील व मा.खा. रणजितसिह नाईक निंबाळकर यांचेशी तालुक्याच्या विकासकामांबाबत चर्चा केली. यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधब, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, माजी जि. प. अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, धनंजय साळुंखे -पाटील, अभिजित नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज फलटण तालुका दौऱ्यात पालखीतळ तरडगाव पालखीतळ फलटण येथे भेट देऊन आढावा घेतला. जिल्हा परिषद शाळा माझेरी आणि माझेरी अंगणवाडीस भेट दिली. तसेच पालखीतळ बरड, प्राथमिक आरोग्य केंद्र बरड, साधुबुवाचा ओढा पालखी विसावा, फळांचे गाव धुमाळवाडी येथे व जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.